स्थानिक

बारामतीतील रूबी हॉल क्लिनिक मध्ये उद्या  मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत हे शिबिर होणार

बारामतीतील रूबी हॉल क्लिनिक मध्ये उद्या  मोफत हृदयरोग तपासणी शिबिर

दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत हे शिबिर होणार

बारामती वार्तापत्र 

बारामतीतील रूबी हॉल क्लिनिक सर्व्हिसेस, तसेच जेजुरी (ता. पुरंदर) येथील जेजुरी आयसीयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हृदयविकार रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

बारामती येथे भिगवण रस्त्यावरील सम्यक लाइफ स्टाइल शेजारी रूबी हॉल क्लिनिक सर्व्हिसेसमध्ये गुरुवारी (ता. ५) सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारापर्यंत, तर जेजुरी येथील आयसीयू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दुपारी दोन ते साडेचार वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे.

पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकचे हृदयरोगतज्ज्ञ रुग्णांची तपासणी करणार आहेत. छातीत दुखणे, दम लागणे, अस्वस्थ होणे, घाम येणे, गुदमरणे, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त असणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी या तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रूबी हॉल क्लिनिकचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. संजय लावंड व बारामतीच्या रूबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापक तुषार सोनवणे यांनी केले आहे.

Back to top button