इंदापूर

विनामास्क दंड भरण्याच्या स्टंट बाजीने नागरिकांमध्ये नाराजी

भरणेंन पाठोपाठ राजवर्धन पाटलांनाही बावडा ग्रामपंचायतीने आकारला पाचशे रुपयांचा दंड.

विनामास्क दंड भरण्याच्या स्टंट बाजीने नागरिकांमध्ये नाराजी

भरणेंन पाठोपाठ राजवर्धन पाटलांनाही बावडा ग्रामपंचायतीने आकारला पाचशे रुपयांचा दंड.

बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मास्क घसरल्याने शंभर रुपये दंड भरला त्यापाठोपाठ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी माझाही मास्क घसरला असे कारण देत स्वतःहून पाचशे रुपयांचा दंड बावडा ग्रामपंचायतीमध्ये भरला दोघांनाही आकारला गेलेल्या दंडाच्या पावत्या त्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर वायरल करताहेत. दंड भरणे,आकाराला जाणे, हा खरा तर अपराध त्याची शिक्षा म्हणून दंड केला जात आहे. खरेतर त्याची वाच्यता समाजामध्ये करणे अपराधीपणाचे लक्षण मानले जाते, मात्र इंदापूर तालुक्यातील राजकारण्यानी सर्वच … सोडल्याची दिसत आहे.कोणत्या बाबतीत स्टंटबाजी करावी राजकारण करावे प्रसिद्धी मिळवावी याचा विसर पडल्याची प्रचिती येत आहे.

तालुक्यातील नागरिकांमध्ये या स्टंटबाजी वरून नाराजीचा सूर निघत आहे.अशी स्टंटबाजी करून दंड भरण्यापेक्षा जनतेमध्ये जागरुकता आणण्यासाठी लक्ष दिले पाहिजे,कोरोनावरती विविध उपाययोजना राबवल्या पाहिजेत,नागरिकांमध्ये मिसळताना स्वतः तोंडावर मास्क घातला पाहिजे, मात्र हे नेते मंडळी अनेक कार्यक्रमांमध्ये तोंडावरचा मास्क काढून बोलत आहेत. हे रोज नागरिकांना दिसत आहे.मात्र क्वचित एखाद्या ठिकाणी दंड भरून त्याचा स्टंट करून नागरिकांची दिशाभूल केल्याचे दिसत असल्याने नागरिक देखील यांच्या स्टंटबाजी मुळे हसत आहेत.ज्यांना दंड आकारला त्यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तोंडाला मास्क नसताना देखील त्यांच्याकडून दंड घेतला जात नाही. मात्र या नेते मंडळीकडूनच का दंड घेतला जात आहे?असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. दंड भरताना काढलेल्या फोटोमध्ये देखील अनेक जण विनामास्क त्यांच्या बाजूला उभे राहिल्याचे दिसून येत आहे. तरीदेखील दंडाची रक्कम हे एकटेच भरताना दिसत आहेत. ही नौटंकी नेमकी कशासाठी?असा सवाल नागरिक विचारत आहेत.

राजकारणासाठी व प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी सुरू आहे. मात्र सध्या तरी यांच्या स्टंटबाजीमुळे शासनाच्या तिजोरीत भर पडल्याचे दिसत आहे हे मात्र तेवढेच सुखद आहे.

Related Articles

Back to top button