बारामतीतील लॉकडाउन सात दिवसांनी वाढवला;जुनेच निर्बंध कायम राहणार तर अत्यावश्यक वस्तूंच्या घरपोच सेवेला परवानगी
अत्यावश्यक सेवा मात्र घरोघरी पोहोच करण्यासाठी प्रशासनाने अनुमती दिली आहे

बारामतीतील लॉकडाउन सात दिवसांनी वाढवला;जुनेच निर्बंध कायम राहणार तर अत्यावश्यक वस्तूंच्या घरपोच सेवेला परवानगी
अत्यावश्यक सेवा मात्र घरोघरी पोहोच करण्यासाठी प्रशासनाने अनुमती दिली आहे
बारामती वार्तापत्र
बारामतीत सात दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर आज दुपारी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत पुन्हा सात दिवसांचा लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात सर्वंकष चर्चा झाली. सात दिवस नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली असून, आणखी सात दिवस हा लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यामध्ये उपस्थित पदाधिकारी व व्यावसायिक उद्योजक यांच्या चर्चेनंतर लॉकडाऊन पुन्हा सात दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा मात्र घरोघरी पोहोच करण्यासाठी प्रशासनाने अनुमती दिली आहे. यामध्ये किराणा व भाजीपाला साहित्याचा समावेश आहे. दूध वितरण सकाळी सात ते नऊ दरम्यान होणार आहे. दवाखाने व मेडिकल वगळता इतर सर्व सेवा मागील लॉकडाऊन प्रमाणेच बंद राहतील.
प्रशासकीय इमारतीमध्ये प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, तहसीलदार विजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव हे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कोरोनाची सद्यस्थिती या संदर्भात प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार विजय पाटील यांनी माहिती दिली. तसेच उपाययोजना संदर्भात मुख्याधिकारी किरणराज यादव व गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी अनुक्रमे शहर व तालुक्यातील माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी एकूणच कोरोनाची परिस्थिती, रुग्णांची संख्या, तुलनात्मक प्रमाण याचा विचार करता कोरोनाची रुग्णसंख्या पूर्ण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व कायदा व सुव्यवस्थेची स्थिती या संदर्भात माहिती दिली.
दरम्यान या बैठकीत चर्चा लसीकरणा कडे वळली आणि यामध्ये लसीकरणाच्या प्रक्रियेमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याबद्दल विरोधी पक्षनेते सुनील सस्ते यांनी प्रशासनाकडे विचारणा केली त्यास गटनेते सचिन सातव यांनी सहमती दर्शवत लसीकरणामुळे राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे मत व्यक्त केले. त्यावरून बरीच चर्चा झाली व या विषयावरून प्रशासनाला राजकीय पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरले.
सर्व आस्थापनाचे मालक, चालक आणि सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. तरी सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिंस्टसिंग या त्रिसूत्रीचे व शासनाच्या सूचनांचे पालन करावे, नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये असे, आवाहनही यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, बारामती नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पोलीस निरिक्षक बारामती शहर नामदेव शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष सभाजी होळकर, भाजपा चे तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे, गटनेते सचिन सातव, व्यापारी असोसिएनचे नरेंद्र गुजराथी, संजय सोमाणी, विरोधी पक्ष नेते सुनिल सस्ते, म.न.से. चे अध्यक्ष ॲड. सुधीर पाटसकर, एम.आय.डी.सी. चे अध्यक्ष धनंजय जामदार, कॉग्रेसचे ॲड. अशोक इंगुले, शिवसेनेचे ॲड. राजेंद्र काळे, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष प्रविण अहुजा, भाजपचे शहर अध्यक्ष सतिश फाळके, नरेंद्र मोता, वैभव बुरूंगले, स्वप्निल मुथा, सनी गालिंदे, ॲड. गिरीष देशपांडे, मधुकर मोरे, बारामती शहरातील व्यापारी व औद्योगिक वसाहतीमधील प्रतिनिधी उपस्थित होते.