बारामती शहर पोलीस स्टेशन आयोजित भव्य महारक्तदान शिबीर संपन्न
एकुण १६४० बाटल्या जमा झालेल्या आहेत

बारामती शहर पोलीस स्टेशन आयोजित भव्य महारक्तदान शिबीर संपन्न
एकुण १६४० बाटल्या जमा झालेल्या आहेत.
बारामती वार्तापत्र
मा.श्री.डॉ.अभिनव देशमुख सो,पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण, यांचे संकल्पणेतुन कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना रक्ताची कमतरता भासु नये,तसेच कोरोनाच्या महामारीच्या काळात पारंपरिक पध्दतीने उत्सव साजरा करून तिसरी लाट येवु नये व त्याचा संसर्ग वाढु नये या सामाजिक बंधीलकीचा उददेश साध्य होण्याच्या दृष्टीकोनातुन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सहाकार्य घेवुन आदर्श गणेश उत्सव सन २०२१ साजरा करण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करणेबाबत सुचित करण्यात आलेले होते.
त्या अनुषगांने आज दिनांक १५/०९/२०२१ मा श्री. मिलींद मोहिते सोो,अपर पोलीस अधिक्षक,बारामती विभाग व मा.श्री.नारायण शिरगावकर सो,उपविभागीय पोलीस अधिक्षक, बारामती उपविभाग,यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी श्री. नामदेव शिंदे बारामती शहर पोलीस स्टेशन आवारात भव्य महारक्तदान शिबीर आयोजन केले होते.
त्यानुसार आजरोजी दिनांक १५/९/२०२१ रोजी सकाळी १०:०० वा. मा श्री डॉ.अभिनव देशमुख सो,पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण, मा.श्री.मिलींद मोहिते सो,अपर पोलीस अधिक्षक,बारामती विभाग व मा श्री नारायण शिरगावकर सो,उपविभागीय पोलीस अधिक्षक, बारामती उपविभाग,प्रभारी अधिकारी श्री.नामदेव शिंदे बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून मा.श्री. डॉ.अभिनव देशमुख सो,पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण, मा.श्री.मिलींद मोहिते सोो,अपर पोलीस अधिक्षक,बारामती विभाग व मा.श्री.नारायण शिरगावकर सोो,उपविभागीय पोलीस अधिक्षक, बारामती उपविभाग, प्रभारी अधिकारी श्री.नामदेव शिंदे बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी प्रथम रक्तदान करून सुरूवात केली.
त्यानंतर प्रभारी अधिकारी श्री.नामदेव शिंदे यांचे आवाहन नुसार बारामती व परिसरातील विविध सामाजिक संघटना, गणेश उत्सव मंडळे,युवा कार्यकर्ते, महिला मंडळ,व कॉलेजचे युवा युवती तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान करून एकुण १६४० बाटल्या जमा झालेल्या आहेत. सदर रक्तदानात अक्षय ब्लड बँक, पंढरपुर ब्लड बँक, आशा ब्लड बँकेच्या तज्ञ डॉक्टर व नर्ससींग स्टाफचे मदतीने भव्य महारक्तदान शिबार आयोजित करण्यात आले होते.