राजकीय

बारामतीतील व्यापारी महासंघाच्या सत्कारावरून वाद; काळुराम चौधरी चौधरींनी केली नाराजी व्यक्त

व्यापारी महासंघाकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

बारामतीतील व्यापारी महासंघाच्या सत्कारावरून वाद; काळुराम चौधरी चौधरींनी केली नाराजी व्यक्त

व्यापारी महासंघाकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर शहरात विजयी नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्या सत्कारांचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहेत. विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि राजकीय घटकांकडून सत्कार समारंभ आयोजित केले जात असून, त्यापैकी एक सत्कार समारंभ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

बारामतीतील व्यापारी महासंघाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बसपाच्या (बहुजन समाज पार्टी) तिकिटावर निवडून आलेल्या तरुण नगरसेविका संघमित्रा काळुराम चौधरी यांचा सत्कार न करण्याबाबत व्यापाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे संघमित्रा चौधरी या केवळ २१ वर्षांच्या असून, निवडणुकीदरम्यान त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे त्या आधीच चर्चेत होत्या.

या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाच्या बैठकीत त्यांच्या सत्काराबाबत आक्षेप घेण्यात आल्याची चर्चा आहे.“ तर काहींच्या मते हा विषय अनावश्यक वादातून वाढवला जात असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, व्यापारी महासंघाकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र या प्रकरणामुळे बारामतीतील सत्कार समारंभांभोवती राजकीय रंग चढल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Back to top button