बारामतीतील व्यापार्याला महिलेने लावला हनी ट्रॅप,,मात्र महिला दिना दिवशीच महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सापळा रचून केली अटक!
मोबाईल वरून ओळख वाढवत महिलेने बारामतीतील व्यापार्याला लावला हनी ट्रॅप

बारामतीतील व्यापार्याला महिलेने लावला हनी ट्रॅप,,मात्र महिला दिना दिवशीच महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सापळा रचून केली अटक!
मोबाईल वरून ओळख वाढवत महिलेने बारामतीतील व्यापार्याला लावला हनी ट्रॅप
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक ८/३/२०२१ रोजी महिला दिनानिमीत्ताचा कार्यक्रम यातु होता व बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे साहेब यांनी महिला दिनानिमीत बारामती शहर पोलीस स्टेशनचा कार्यभार महिला अधिकारी सहा पोलीस निरीक्षक शेडगे मैडम महिला अंमलदार यांचेकडे सोपवुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन देत होते दुपारी इसमनामे कमला शंकर पाडे वय ४५ वर्षमा अशोकनगर जैन मंदिरसमोर मयुरेश्वर अपार्टमेंट प्लॅट नं १४ बारामती ता बारामती जि.पुणे पोलीस स्टेशनमायो आले व त्यांनी हकीगत सांगीतली की,दिनांक १७/२/२०२१ रोजी फलटण येथील मुलगी स्मीता गायकवाड हिने तीचे मोबाईल फोनवरुन त्यांचेशी ओळख निर्माण करुन फोटो पाठवुन,तसेच व्हिडीओ कॉल करन गोड बोलून गप्पा मारुन त्यांना फलटण येथे दिनांक २७/२/२०२१ रोजी बोलावुन घेवुन ते तीचे प्लंटवर गेलेवर तेथे अचानक तीचे अनोळखी मैत्रीण तसेच मित्र त्यांनी त्यांचे नावे आशीष पवार व गुरु काकडे यानी येवुन तकारदार यांना तुमचेवर महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करणेची भिती घालुन तसेच जिवे मारणेची धमकी देवुन त्यास १० लाख रुपयांची खंडणी मागीतली तकारदार याने तो गरीब असल्याचे सांगीतलेवर त्यास पाच लाख रुपये तरी खंडणी दे असे म्हणालेवर तकारदार याने भितीपोटी त्यास हो म्हणालेवर त्यांचेबरोबर गुरु काकडे हा नाय सांगणारा
इसम तकारदार याचेबरोबर बारामतीत येवुन त्यांचेकडुन एक लाख रुपये खंडणी घेवुन तकादार यास आणखी चार लाख रुपये तयार ठेव घ्यायला येतो असे धमकावुन गेला.सदर प्रकाराने तकारदार घाबरुन व इज्जत जाईल या भितीपोटी मानसीक तनावाखाली गेले होते व ते आत्महत्या करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगीतले व आज रोजी देखील गुरु काकडे हे खंडणीचे उर्वरीत चार लाख रुपये मागणेकरीता बारामती एस.टी स्टन्ट येथे येत असल्याचे सांगीतलेने सदरची बाब पोलीस निरीक्षक नामदेव शिदे यांनी गांभीर्यानी घेत तकारदार यांना चिर देवुन सदर बाब मा.पोलीस अधिक्षक सो.अभिनव देशमुख,मा.अप्पर पोलीस अधिक्षक सो मिलीद मोहिते,मा उपविभागीय पोलीस अधिकारी सो.नारायण शिरगावकर यांना सांगुन वरीष्ठांचे मार्गदर्शनानुसार एक पथक तयार करून सापळा
कारवाई करुन तकारदार यांची तात्काळ दखल घेवुन पुढील रितसर कारवाई करणेचे आदेश दिलेने श्री नामदेव शिंदे यांनी महिला दिनानिमीत्त कार्यभार पाहत असलेले सपोनि शेंडगे यांना सदरची जबाबदारी देवुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सपोनि शेडगे मॅडम यांनी वरीष्ठांनी दिले आदेशाप्रमाणे तकादार यांची तात्काळ दखल घेत लागलीच शासकिय पंच बोलावून घेवुन पंच व पोलीस स्टाफ तसेच तकादार यांना सापळा कारवाई करावयाची असल्याचे सांगुन तकादार यांनी सापळा कारवाई करीता उपलब्ध असलेली त्यांचेकडील २०,०००/- रुपये रोख रक्कम त्यामध्ये २०००/- रुपये दराच्या १० नोटा अशा हजर केल्या त्या नोटांचे पंचासमक्ष नंबर नमुद करुन ते सदरची रक्कम तकारदार यांचेकडे ठेवण्यात आली सपोनि शेंडगे मॅडम या सोबतचे स्टाफ,पंच,तकारदार यांचेसह
साथेवेशात खाजगी वाहनांनी बारामती एस.टी.स्टॅन्ड येथे जावुन वाहने बाजुला लावुन बसस्थानकात यातील तक्रारदार याचे काही अंतरावर थांबुन राहिले थोडयाच वेळात गुरु काकडे या नाव सांगणार इसम त्याचे ताब्यातील वॅगनार कार एम.एच.४८/ए.सी/४६२६ यामधुन एस टी बसस्थानकात येवुन कार बाजुला लावुन तकादार यांचेसमोर येवुन त्याने खंडणी रक्कम तकारदार याचेकडुन स्वीकारुन पॅन्टचे खिशात ठेवली असता त्यास पोलीसांची चाहुल लागताच तो पळु लागताच त्यास सपोनि शेंडगे यांनी स्टाफचे मदतीने एस.टी.बसस्थानकातच त्याचा पाठलाग करुन सिने स्टाईल पद्धतीने जागीच पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव राकेश रमेश निंबोरे वय २४ वर्षे,रा.साखरवाडी ता.फलटण जि.सातारा असे असल्याचे सांगीतले त्याने स्वीकारलेली खंडणीची रक्कम,तसेच त्याने गुन्हयात वापरलेली कार,त्याच प्रमाणे त्याचे अंगझडतीत मिळुन आलेला त्याचा मोबाईल असा एकुण ३,३०,०००/- रुपयाचा एकुण मुददेमाल गुन्हयाचेकामी पंचासमक्ष जप्त केला ‘असुन त्याने सदरचा गुन्हा १)स्मीता दिलीप गायकवाड वय २३ वर्षे रा.फलटण बिरदेवनगर ता.फलटण जि. सातारा २)आशीष अशोक पवार वय २७ वर्षे,रा.भुईज ता.वाई जि.सातारा,३)सुहासीनी योगेश अहिवळे वय २६ रा.मंगळवारपेठ फलटण बिरदेवनगर ता.फलटण जि.सातारा यांचे मदतीने केला असल्याची कबुली दिली असुन
तकारदार यांनी दिले तकारीनुसार वरील चौघांविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशनला गु.रजि.नं १६५/२०२१ भा. द.वि कलम ३८४,३८६,३८८,१२० ब,५०६,३४ प्रमाणे दाखल करुन वरील चौघांना सदर गुन्हयाचेकामी अटक केली आहे.
सदरचा आरोपी राकेश रमेश निंबोरे वय २४ वर्षे,रा साखरवाडी ता.फलटण जि. सातारा यावर सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर सदरचा गुन्हा तसेच दाखल असलेल्या गुन्हयाची माहिती घेता त्यावर खालील प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
१) लोणंद पोलीस स्टेशन गु रजि.नं १३७/२०१६ भा.द.वि कलम ३८४,५०४,५०६,३४
२) लोणंद पोलीस स्टेशन गु.रजि.नं १६१/२०१६ भा.द.वि कलम ३९२,३४१,३४
३) लोणंद पोलीस स्टेशन गु.रजि.नं १६२/२०१६ भा.द.वि कलम ३९२,३४७,५०६,३४
४) लोणंद पोलीस स्टेशन गु.रजि.नं १३७/२०१६ भा.द.वि कलम ३९४,५०४,५०६,३४
५) फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गु.रजि.नं. २३६/२०१६ भा.द.वि कलम ३२४,५०६,३४
६) फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गु.रजि.नं ३६८/२०१९ भा.द.वि कलम ३६३,३६४,३४६,३०७,३२४,
१४३,१४७,१४९,५०४,५०६
७) फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गु.रजि.नं ७/२०१९ भा.द.वि कलम ३०७,३२६,१४३.१४७,१४८.१४९,
५०४,५०६,३५४,५०९,३४१
८) फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गु.रजि.नं ७७/२०२१ भा.द.वि कलम ३२६ वगैरे
९) फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन गु.रजि.नं ६०२/२०१९ भा.द.वि कलम ३६३,३०७,आर्म अॅक्ट,३,२७
१०)फलटण शहर पोलीस स्टेशन गु.रजि.नं ३११/२०२० भा.द.वि कलम ३५३,३३२,३३६,३२४,३२३,३४
११)बारामती शहर पोलीस स्टेशन गु.रजि.नं ४०८/२०१८ भा.द.वि कलम ३९४,३४
वरील प्रमाणे गुन्हे दाखल असुन वरील आरोपी क १ ते ४ यांनी बारामती शहर व परीसरात अशाचप्रकारे प्रतिष्टीत लोकांवर हनीद्वैप करुन खडणी वसुल करणारे अनेक गुन्हे केले असल्याची दाट शक्यता असल्याने असा प्रकार त्याचेबाबत घडला असलेस तकारदार यांनी पोलीस स्टेशनला न घाबरता तकार देण्यास यावे असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
तसेच महिला दिनी एका महिला पोलीस अधिकारी यांनी वरीष्ठांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पारपाडुन एका महिला आरोपी हिने तीचे इतर सराईत आरोपींचे मदतीने केलेले हनीपचा पर्दाफाश करुन एका तकारदार याचे जिव वाचविलेने त्यांचे वरीष्ठांनी अभिनंदन केले आहे.
सदरची कामगिरी मा अभिनव देशमुख सो, पोलीस अधिक्षक,पुणे ग्रामीण, मा.मिलींद मोहिते सो, अपर पोलीस अधिक्षक,बारामती विभाग, मा.नारायण शिरगावकर सो, उपविभागीय पोलीस अधिकारी,बारामती उपविभाग, मा. नामदेव शिदे पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे महिला सहा पोलीस निरीक्षक श्रीमती. अश्विनी शेंडगे,पो.ना.मोरे बं.नं १९२०,पो.ना देशमाने व ने २२५९,पो.कॉ.जाधव ब नं १३१०,पो.कॉ.दळवी ब.नं १९२.६.पो.कॉ राउत ब.नं १३५४,पो.कॉ.इंगोले बन १८८० यांनी केली आहे.