क्राईम रिपोर्ट

बारामतीतील व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी,कामगार दुकानात दगड घेऊन घुसला अन्.

काही वर्षांपूर्वी कामावरुन काढून टाकले होते.

बारामतीतील व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी,कामगार दुकानात दगड घेऊन घुसला अन्.

काही वर्षांपूर्वी कामावरुन काढून टाकले होते.

बारामती वार्तापत्र 

राज्यात एकामागून एक गोळीबाराच्या आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता बारामती शहरातील देखील असाच काही प्रकार समोर आला आहे.सम्यक लाईफ स्टाईलचे मालक आनंद किशोरकुमार छाजेड यांच्यावर शनिवारी (दि १) एका कामगाराने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये आनंद छाजेड यांच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये खोलवर जखम झाली असून नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

सम्यक दुकानातील एका कामगाराला छाजेड यांनी काम व्यवस्थित करत नसल्याने काही वर्षांपूर्वी कामावरुन काढून टाकले होते. त्याने गेल्या दोन वर्षात त्यांच्या दुकानात जाऊन तोडफोड करुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. बारामती शहर पोलिसांनी त्या वेळेस त्याला अटक करुन कारवाईही केली होती.

शनिवारी हातात दगड घेऊन संबंधित कामगार दुकानात घुसला, त्याने काचा फोडल्या. दुकानात उपस्थित असलेल्या आनंद छाजेड यांच्या अंगावर दगड घेत तो धावून गेला, त्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. दगड डोक्यात लागू नये म्हणून मागे सरकलेल्या आनंद यांच्या चेह-यावर दगड लागला, त्यांना आठ टाके घालण्यात आले आहेत.
दरम्यान या घटनेचा बारामती व्यापारी महासंघाने निषेध केला असून सोमवारी (ता. 9) सकाळी अकरा वाजता व्यापा-यांचे शिष्टमंडळ पोलिसांना भेटून या बाबत निवेदन देणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेची दखल घेत तातडीने पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना केल्या आहेत. बारामती शहर पोलिसांनी संबंधित हल्लेखोरास ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button