बारामतीतील व्हीपीकेबीआयईटीमध्ये पालक मेळावा उत्साहात
अकॅडमिक्स यांनी शैक्षणिक उपक्रम व अध्यापन पद्धतींबाबत मार्गदर्शन

बारामतीतील व्हीपीकेबीआयईटीमध्ये पालक मेळावा उत्साहात
अकॅडमिक्स यांनी शैक्षणिक उपक्रम व अध्यापन पद्धतींबाबत मार्गदर्शन
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती येथे पालक मेळावा उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, पालकांशी थेट संवाद साधणे आणि त्यांच्या सूचना जाणून घेणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. हा मेळावा विद्या प्रतिष्ठान व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.
मुख्य सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. दीपक सोनावणे यांनी केले. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. सुरज कुंभार, जनसंपर्क अधिकारी यांनी प्रास्ताविक करताना पालक व संस्थेमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. एस. एम. भोसले,डीन अकॅडमिक्स यांनी शैक्षणिक उपक्रम व अध्यापन पद्धतींबाबत मार्गदर्शन केले, तर प्रा. ज्योती कुलकर्णी,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण व प्लेसमेंट उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी गेट परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. एस. बी. लांडे यांनी संस्थेची प्रगती, उद्दिष्टे व भावी दिशा स्पष्ट केली. पालक प्रतिनिधी श्री. शशिकांत चौधर यांनी संस्थेबद्दल समाधान व्यक्त करत सकारात्मक अभिप्राय दिला.
यानंतर झालेल्या संवाद सत्रात पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसंदर्भात आपले विचार व सूचना मांडल्या. कार्यक्रमाचा समारोप डॉ. पी. आर. चित्रागर,डीन माजी विद्यार्थी यांनी आभार प्रदर्शनाने केला. त्यानंतर पालकांनी संबंधित विभागांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या निकाल व उपस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या मेळाव्यामुळे पालक व संस्थेमधील संवाद अधिक दृढ झाला आहे.






