बारामतीतील शासकीय कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न!
प्रशासकीय कार्यालयातील लोक घाबरून गेले.
बारामतीतील शासकीय कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न!
प्रशासकीय कार्यालयातील लोक घाबरून गेले.
क्राईम;बारामती वार्तापत्र
लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने लोकांची सत्ता असते. लोकांची कामे होत नसतील अन्याय होत असेल तर त्यांना. आंदोलन करण्याचा हक्क आहे. परंतु आंदोलन हे लोकशाही मार्गाने असले पाहिजे.
त्यामध्ये आंदोलन कर्त्याच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या शारीरिक व मालमत्ता विषयक हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.परंतु आज विलास महादेव कोकरे राहणार ढाकाळे यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे नवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कारंजे तालुका बारामती यांच्याकडे त्यांची व त्यांच्या भावाची आर्थिक फसवणूक केली म्हणून अर्ज केला होता सदर अर्ज स्वतः सहाय्यक निबंधक हे करत नसल्याबाबत व न्याय मिळत नसलेचे निरीक्षण नोंदवून संबंधित आंदोलन कर्त्याने 25 फेब्रुवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर पोलिस प्रशासनाने सहाय्यक निबंधक श्री टांकसाळे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी सांगितले की. तक्रारदारांनी केलेल्या तक्रारी नुसार त्यांनी सर्व चौकशी केली आहे. त्यांच्याबरोबर सहानुभूतीपूर्वक वर्तन सुद्धा केलेले आहे. परंतु त्यांची मागणी ही कायद्याला धरून नाही. त्यांना सहाय्यक निबंधक कार्यालय मदत करायला तयार आहे असे सांगितले परंतु ते कार्यालयात चर्चेसाठी येत नाहीत व आंदोलनाचा इशारा देतात असे सांगितले.
व त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला त्यांना लेखी कळवले परंतु त्यांनी दिलेले लेखी त्यांनी स्वीकारले नाही. त्यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांनी सुद्धा त्यांना आत्मदहन न करण्याबाबत परावर्तित करण्याचा प्रयत्न केला.
शासन दरबारी त्याला सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले परंतु आज दुपारी सदरचे आंदोलन करते हे स्वतःचे अस्तित्व लपवून कालपासून घरातून निघून गेले. मग पोलिसांनी त्याच्या गावी घरावर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे नोटीस चिकटवण्यात आली. परंतु सदर नोटीस सुद्धा आंदोलनकर्त्यांनी मानली नाही .
आणि आज ते गनीमीकाव्याने सहाय्यक निबंधक कार्यालयात सर्व कार्यालयीन लोक हजर असताना घुसले. व त्यांनी त्याठिकाणी आरडाओरडा केला व स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यामुळे प्रशासकीय कार्यालयातील लोक घाबरून गेले. त्या ठिकाणी स्थानिक नागरिक व बंदोबस्ताला उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी प्रसंगावधान राखून सदर इसमाकडून काडी पेटी काढून घेतली. तरीसुद्धा सदरचा इसम हा बेफामपणे रॉकेल ने भिजलेल्या अंगाने त्याठिकाणी आरडाओरडा करत होता.
त्या ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या सूचना न पाळता त्यांच्या बरोबर सुद्धा हुज्जत घालत होता व आंदोलनापासून परावृत्त होत नव्हता त्यामुळे पोलिसांनी त्याला गाडीमध्ये घालून बारामती शहर पोलीस ठाण्यात आणण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांना विरोध करत होता व झटापट करत होता.
अशाप्रकारे आक्रस्ताळेपणाने आंदोलन करणे हे स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या जीवाला घातक होऊ शकते. म्हणून सदर इसमावर बारामती शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे व शासकीय लोकांना धमकावणे या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. व सदर इसमाला ताब्यात घेतलेली आहे.
दाखल गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे हे करत आहेत. सदर आंदोलन स्थळी पोलीस उपनिरीक्षक पाटील पोलीस हवालदार डोईफोडे नाळे खांडेकर इत्यादी लोक सदर इसमाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे बंदोबस्तासाठी लावण्यात आलेले होते.
खरतर याप्रकारे कुणाच्या जीविताला धोका होण्यासारखा कुणी आंदोलन करण्याबाबत माहिती सामान्य जनतेला किंवा समाज माध्यमांना मिळत असेल तर सर्वात प्रथम त्याच्या जीवाला धोका होणार नाही याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे. समाज माध्यमांनी त्याला या प्रकारचे आंदोलने करण्यापासून परावृत्त केले पाहिजे. पोलिसांना या बाबतीत सहकार्य केले पाहिजे.
अशा प्रकारे जर आपण काहीच कारवाई केली नाही आणि अपघाताने किंवा ठरवून अनुचित प्रकार घडला त्यात निष्पाप जीव जाऊ शकतो. प्रशासनाची बदनामी होऊ शकते.
आणि मूळ प्रश्न निरुत्तर राहतो. तरी सर्व जनतेला आव्हान आहे की या प्रकारे आंदोलन आपण यापुढे करू नये अन्यथा कायदेशीर मार्गाने कारवाई होईल. आपले प्रश्न सुटत नसतील तर निवेदने द्या अन्याय होत असेल तर पोलीस कायदेशीर पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला मदत करतील. स्थानिक कार्यालयात प्रश्न सुटत नसतील तर आपण वरिष्ठ कार्यालयात जाऊन सुद्धा दाद मागू शकता.