शैक्षणिक

बारामतीतील श्री छत्रपती शाहू हायस्कुल ला शाळेसाठी मदत

विद्यालयातील शाहू मराठा बोर्डिंगची ७५ वर्षे जुनी आठ वर्ग

बारामतीतील श्री छत्रपती शाहू हायस्कुल ला शाळेसाठी मदत

विद्यालयातील शाहू मराठा बोर्डिंगची ७५ वर्षे जुनी आठ वर्ग

बारामती वार्तापत्र

बारामती येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शाहू हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथील वर्ग खोल्या साठी बारामती कॅटल फिड्स चे चेअरमन सचिन माने यांनी छतासाठी लागणारे सर्व पत्रे देऊन सहकार्य केले आहे.

या प्रसंगी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विजय पेटकर ,अनुरेखक रामचंद्र माने ,बारामती चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे, उद्योजक पी एस कांबळे,एच. आर. मॅनेजर अमोल धायगुडे, प्राचार्य गणपत तावरे ,राजेंद्र गोफने व इतर अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यालयातील शाहू मराठा बोर्डिंगची ७५ वर्षे जुनी आठ वर्ग खोल्या असणारी इमारत मोडकळीस आली असून तिची डागडुजी किरकोळ बांधकाम चालू असून त्यासाठी मदत म्हणून सचिन माने यांनी सहकार्य केले आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारानुसार विद्यार्थी शिकला पाहिजे व आर्थिक दृष्ट्या कमकुवत विध्यार्थी ना शिक्षण मिळावे व व प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे शिक्षणासाठी मदत करावी या विचारानुसार हायस्कुल ला मदत करत असल्याचे सचिन माने यांनी सांगितले.

प्राचार्य गणपत तावरे यांनी आभार मानले.

Back to top button