बारामतीतील सतीश पांडकर यांचे सुपुत्र अथर्व पांडकर यांनी सी. ए. परीक्षेत घवघवीत यश
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अकरावी बारावी पर्यंत शिक्षण झाले आहे.

बारामतीतील सतीश पांडकर यांचे सुपुत्र अथर्व पांडकर यांनी सी. ए. परीक्षेत घवघवीत यश
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अकरावी बारावी पर्यंत शिक्षण झाले आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील सतीश पांडकर यांचे सुपुत्र अथर्व पांडकर यांनी सी. ए. परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. चांगल्या गुणांनी पास होऊन ते उत्तीर्ण झाले आहेत. अथर्व यांचे प्राथमिक आणि माध्यमिक दहावी पर्यंत शिक्षण बारामती हायस्कूलमध्ये झालेले आहे.
त्यानंतर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अकरावी बारावी पर्यंत शिक्षण झाले आहे.
यानंतर बी कॉम शिक्षण त्यांनी सिंहगड इन्स्टिट्यूट येथे पूर्ण केले. अथर्व यांनी बारावीच्या परीक्षेनंतर शिक्षणानिमित्त पुण्याला शिक्षणासाठी जाणे पसंद केलं, त्यानंतर तिथून पुढे एक वर्ष त्यांनी सी. ए. फाउंडेशनचा अवघड अभ्यास करून ती परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर कोरोना काळात ताळेबंदच्या कारणाने पुढील शिक्षण एक वर्ष बारामती येथे त्यांच्या निवासस्थानी करावे लागले.
डिसेंबर 2021 या परीक्षेमध्ये सीए इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील सी. ए. आर्टिकल्स तीन वर्ष कीर्तने अँड पंडित चार्टर्ड अकाउंटंट या ठिकाणी केले. पुण्यातील कीर्तने अँड पंडित चार्टर्ड अकाउंटंट हे नामांकित चार्टर्ड अकाउंटंट फॉर्म आहे.
देशातील विविध इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या कामाच्या उत्तम दर्जा साठी प्रसिद्ध आहे. अथर्व यांच्या यशामध्ये त्याचे वडील सतीश पांडकर, आई सुजाता पांडकर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. अथर्व यांच्या या अनमोल यशाबाबत सर्वं स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.