स्थानिक

बारामतीतील हॉटेल च्या माध्यमातून दिवाळी मध्ये किल्ले दर्शन

"गडकिल्ल्यांवरून दिसणारे विहंगम दृश्य, "

बारामतीतील हॉटेल च्या माध्यमातून दिवाळी मध्ये किल्ले दर्शन

“गडकिल्ल्यांवरून दिसणारे विहंगम दृश्य, ”

बारामती वार्तापत्र 

जेवण करण्यास येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास राज्यातील किल्ल्यांची माहिती व्याहवी ,इतिहास कळवा म्हणून हॉटेल जायका यांच्या वतीने दरवर्षी एक किल्ला हा उपक्रम राबविला जातो.

२०२५ च्या दिवाळी मध्ये मुरुड जंजिरा हा किल्ला बनविण्यात आला असून बीपिन जगताप, सुजित अडागळे, ऋषी चौधरी, अन्नू कोल, रविकुमार नाळगे,राम बोहरा या कामगारांनी सदर किल्ला बनविला आहे.

महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा भारतासाठी आणि विशेषतः महाराष्ट्राच्या समृद्ध वारशासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे.

ही आंतरराष्ट्रीय मान्यता केवळ या किल्ल्यांच्या वास्तुशिल्पीय सौंदर्याची नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी दूरदृष्टी, धोरणात्मक नियोजन आणि स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याचीही पावती आहे.

गडकिल्ला, “गडकिल्ल्यांवरून दिसणारे विहंगम दृश्य, “आजच्या युवा पिढीला इतिहासाच्या पानांतून प्रत्यक्ष अनुभवायला मिळावा म्हणून हॉटेल झायका तर्फे प्रत्येक वर्षी नवीन किल्ला उभारला जातो व इतिहासाची प्रेरणा घेऊन जेवण करणाऱ्या ग्राहकास माहिती दिली जात असल्याचे हॉटेल जायका चे संचालक ऋषी बांदल यांनी सांगितले.

Back to top button