कोरोंना विशेष
बारामतील ५४ पैकी ४५ निगेटिव्ह तर ९ अहवाल येणे बाकी.
अशी माहिती तालुका अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली.
बारामतील ५४ पैकी ४५ निगेटिव्ह तर ९ अहवाल येणे बाकी
बारामती तालुक्यात दि.४ जुलै रोजी एकाच दिवशी ५ रुग्ण आढळून आले होते या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ५४ जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे.
स्वॅब घेण्यात आलेल्यापैकी ४५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बाकी ९ व्यक्तींचा अहवाल येणे बाकी आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी दिली आहे.
४५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असून बाकी संशयितांचा अहवाल काय येतो याकडे तालुक्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
दरम्यान शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच मास्कचा व सँनीटायझर चा वापर करावा,विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.