बारामतीत अजुन 12 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
बारामतीची रुग्ण संख्या 582 झालेली आहे.
बारामतीत अजुन 12 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
बारामतीची रुग्ण संख्या 582 झालेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीतील रुई ग्रामीण रुग्णालयात झालेल्या एन्टीजन तपासणीत शहरातील दहा आणि ग्रामीण भागातील दोघांसह खासगी प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीत सहा असे एकूण १६ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिवसभरातील कोरोना बंधितांची संख्या २६ वर पोहोचली आहे.
बारामती आज दुपारी आलेल्या अहवालात कोरोनाचे तब्बल दहा रुग्ण आढळले. आज रुई ग्रामीण रुग्णालयात ३४ नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील २२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती शहरातील दहा व ग्रामीण भागातील दोन अशा १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तसेच बारामती शहरातील खाजगी प्रयोगशाळेमध्ये संध्याकाळनंतर घेण्यात आलेल्या १९ नमुन्यांपैकी बारामती शहरातील तीन व ग्रामीण भागातील एक असे चार नमुने एंटीजेन पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात एकूण २६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून बारामतीतील एकूण रुग्णसंख्या ५८२ वर गेली आहे.
आज दिवसभरात एकूण 10+12+4=26 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.