डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान मूलभूत अधिकार देण्याचे कार्य केले-हर्षवर्धन पाटील
जेतवन विहार येथे महापरिनिर्वाण दिनी महामानवास केले अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समान मूलभूत अधिकार देण्याचे कार्य केले-हर्षवर्धन पाटील
जेतवन विहार येथे महापरिनिर्वाण दिनी महामानवास केले अभिवादन
इंदापूर:प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी देशासाठी रचनात्मक असे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील जेतवन बुद्ध विहार याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करताना आज रविवारी (दि.6) रोजी काढले.
हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर नगरपरिषदेच्या समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्यांनी जेतवन बुद्ध विहार याठिकाणी डॉ.आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, नगरसेविका राजश्री मखरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, मुकुंद शहा, रिपाइंचे पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजी मखरे, रिपाइंचे बारामती लोकसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, प्रा अशोक मखरे, मंगेश पाटील, प्रा. कृष्णा ताटे, नगरसेवक कैलास कदम,शकील सय्यद,प्रा.जीवन सरवदे, वंचित बहुजन आघाडीचे हनुमंतराव कांबळे यांनी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच यावेळी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले ,’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून समता, सर्वधर्म समभावनेचा संदेश दिला. देशातील गरीब असो श्रीमंत माणूस असो या सर्वांना लोकशाहीचा समान मूलभूत अधिकार देण्याचे कार्य केले आहे. देशातील सर्व समाजाकरीता त्यांनी काम केले आहे. युगपुरूषांनी घालून दिलेल्या मार्गाचा अवलंब आपण केला पाहिजे. गौतम बुद्धांचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढचे हजारो वर्ष सर्वांना तारणार आहेत. तोच विचार हा आपला मजबूत पाया समजून सर्वांनी पुढे वाटचाल करावी.’
यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, माजी उपनगराध्यक्ष प्रा. कृष्णा ताटे तसेच कु.विवेका बजरंग मखरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नगरसेवक भरत शहा, अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, नगरसेवक जगदीश मोहिते, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, गणेश महाजन, दादा पिसे, रमेश धोत्रे, सागर गानबोटे, पांडुरंग शिंदे, गोरख शिंदे, माऊली वाघमोडे, हमीद आतार, सुधीर मखरे,प्रा. श्रीनिवास शिंदे, प्रा. तानाजी कसबे उपस्थित होते.सूत्रसंचालन शिवाजी मखरे यांनी केले.आभार संदिपान कडवळे यांनी मानले.