
बारामतीत आंबेडकर उत्सव उत्साहात संपन्न
पुतळा परिसरात मोठा जनसागर लोटला होता.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहत संपन्न जयंती उत्सव समिती बारामती आयोजीत आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली .
गेली दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे कोणताही सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आले नाहीत यावेळेस निर्बंध शिथिल झाल्याने भीमप्रेमीनी जल्लोषात जयंती साजरी केली आसुन शहरात ठिकठीकाणी स्वागत कमानी आणि भीममाय वातावरण निमार्ण झाले आहे .
गुरुवारी दि.१४ शहरात विविध कार्यक्रम पार पडले. अभिवादनासाठी इंदापूर रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठा जनसागर लोटला होता.येथे सकाळी साडेनऊ वाजता पूजापाताचा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, माजी नगराध्यक्ष भारत अहिवळे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, माजी गटनेते सचिन सातव राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, माजी नगरसेविका आरती शेंडगे, मयुरी शिंदे, माजी नगरसेवक गणेश सोनवणे , इत्यादी मान्यवर उपस्थित होते .शरयू फाउंडेशनच्या अध्यक्ष शर्मिला पवार यांनीही अभियान केले.
दरम्यान, जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध भागात जयंती उत्सव मंडळांनी रॅली काढून जल्लोष केला.सायंकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.आकर्षक रोषणाईने संपूर्ण बारामती परिसर उजळून निघाला होता.ठिकठिकाणी फ्लेक्स व स्वागत कमानी उभारल्या गेल्या.
शहरातील चंद्रमीनार व बुद्ध विहार, पंचशीलनगर, सटवाजीनगर येथे विविध सामाजिक उपक्रम पार पडले. शहरात पोलिसांकडून चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह गैतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,शाहू महारान, अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांची भव्य शुभारंभ मिरवणूक काढण्यात आली.यात हजारो भीम अनुयायी सहभागी झाले होते. नगरपालिका, प्रांत व तहसील कार्यालय, ऊर्जा भवन, शाळा व महविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.