
बारामतीत आजही कोरोणा रूग्नांची संख्या 17 वर
बारामतीतील एकूण रुग्ण संख्या पाच हजार 647
बारामती वार्तापत्र
बारामतीत काल 17 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते व आजही 17 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एकूण 83 शासकीय rt-pcr नमुने तपासण्यात आले त्यापैकी 6 नमुने पॉझिटिव आले असून ,खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 18 नमुने होते त्यापैकी पॉझिटिव 4 आले असून , तर एंटीजन एकूण 38 तपासण्यात पैकी त्यामधून 7 पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत. त्यामुळे बारामतीची एकूण रुग्ण संख्या 17 झाली असून शहरात 11 व ग्रामीण भागात 6 अशी रुग्ण संख्या आहे.
त्यामुळे आता बारामतीतील एकूण रुग्ण संख्या पाच हजार 647 तर,,, बरे झालेले रुग्ण संख्या 5246व,,, एकूण मृत्यू 136 असे आहेत.
बारामती तालुक्यात परवा आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शहरातील 37 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरुष, वसंत नगर येथील 36 वर्षीय पुरुष, कल्याणीनगर येथील 59 वर्षीय महिला, तांबे नगर येथील 27 वर्षीय पुरुष, मळद येथील 49 वर्षीय पुरुष, सूर्यनगरीतील 19 वर्षीय युवक, म्हाडा कॉलनी 24 वर्षीय पुरुष, जगताप मळा येथील 28 वर्षे पुरुष, 25 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 22 वर्षीय पुरुष, पिंपरी येथील 60 वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील 30 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
तुम्ही घरात बसा ,,कोरोणाला हरवा,विनाकारण गर्दी करू नका मास्क लावा ,सामाजिक अंतर पाळा