कोरोंना विशेष

बारामतीत आजही कोरोनाचे 13 रुग्ण पॉझिटिव

शहरापेक्षा ग्रामीण ची संख्या जास्तच

बारामतीत आजही कोरोनाचे 13 रुग्ण पॉझिटिव

शहरापेक्षा ग्रामीण ची संख्या जास्तच

बारामती वार्तापत्र
काल बारामतीत 18 रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये आज 5 रुग्णाची घट होत एकूण रुग्ण संख्या 13 झाली आहे.
मात्र आजही शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्ण संख्या जास्त आहे. त्यामुळे नागरिकांनी अजूनही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

तपासलेल्या एकूण शासकीय rt-pcr 73 नमुन्यांपैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत, तर तालुक्यातील खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 21 नमुन्यांपैकी 5 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत तर एटीजन 32 नमुन्यांपैकी 4 पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे दिवसभरातील एकूण रुग्ण संख्या 13 झाली आहे. यामध्ये शहरातील 5 तर ग्रामीण भागातील 8 अशी रुग्ण संख्या आहे.

आजपर्यंत एकूण रुग्ण संख्या 5703 व एकूण बरे झालेले 5364 व 136 मृत्यू झाले आहेत.

तुम्ही घरी राहा, सुरक्षित रहा मास्क सॅनीटायझरचा वापर करा, काळजी घ्या ,घाबरू नका, अनावश्यक गर्दी टाळा

Related Articles

Back to top button