बारामतीत आजही कोरोनाचे 22 रुग्ण
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढली
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना ची एकूण संख्या 22 झाली आहे.
शासकीय rt-pcr 92 नमुन्यामधून 13 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 23 rt-pcr रुग्णांपैकी 6 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 28 नमुन्यांपैकी 3 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
शहरातील9 तर ग्रामीण भागातील 13 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात 4 ने रुग्णसंख्या वाढली आहे.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 5921 आहे तर बरे झालेले रुग्ण 5578 व एकूण मृत्यु 139 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.अनावश्यक गर्दी टाळा