बारामतीत आज कोरोणाची रुग्ण संख्या वाढतेय काळजी घ्या !
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढली
बारामतीत आज कोरोणाची रुग्ण संख्या वाढतेय काळजी घ्या !
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढली
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यात काल आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सोनवडी सुपे येथील 23 वर्षीय पुरुष, वाकी येथील 38 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 45 वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील तीस वर्षीय पुरुष, अमरदीप हॉटेल येथील 23 वर्षीय महिला, पाटस रोड येथील 33 वर्षीय महिला, एमआयडीसी येथील 38 वर्षीय पुरुष, चोपडज येथील 36 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला आरटीपीसीआर तपासणीत कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामती तालुक्यात काल मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सावतामाळी नगर कसबा येथील 60 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, सायली हिल येथील 33 वर्षीय पुरुष, महावीर पेठ गांधी चौक येथील 78 वर्षीय महिला, मूर्टी राजपुरे वस्ती येथील 42 वर्षीय पुरुष, मारुती मंदिर गुणवडी येथील 43 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 48 वर्षीय पुरुष, टेंबरे वस्ती पिंपळी येथील 70 वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा