कोरोंना विशेष

बारामतीत आज कोरोनाची सत्तरी कडे वाटचाल, ६८ पॉझिटिव्ह, १ मृत्यु

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ७४७३ वर गेली आहे.

बारामतीत आज कोरोनाची सत्तरी कडे वाटचाल, ६८ पॉझिटिव्ह, १ मृत्यु

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ७४७३ वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात ४५ आणि बारामती ग्रामीण मध्ये २३ रुग्णसंख्या झालेली आहे.

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये २७९ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ३४ रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ४६ नमुन्यांपैकी १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या ४१ नमुन्यांपैकी एकूण १५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत तपासणी  आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये खंडोबानगर येथील ५५ वर्षीय महिला, कदम चौक येथील ६३ वर्षीय पुरुष, सिद्धेश्वर कॉलनी येथील ६८ वर्षीय पुरुष, नेवसे रोड येथील ४१ वर्षीय महिला, देशपांडे इस्टेट येथील ३९ वर्षीय पुरुष, पणदरे येथील ३५ वर्षीय महिला, गुणवडी येथील ३५ वर्षीय महिला, महिला सोसायटी येथील ४० वर्षीय पुरुष, उर्जा भवन येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सूर्यनगरी येथील ९ वर्षीय मुलगा, जळोची येथील ४७ वर्षीय पुरुष, बारामती शहरातील ४७ वर्षीय पुरुष, मुक्ती नक्षत्र येथील ४५ वर्षीय महिला, पणदरे येथील ५६ वर्षीय पुरुष, मळद येथील ५ वर्षीय मुलगा, एमआयडीसी येथील २० वर्षीय महिला, बारामती शहरातील ६२ वर्षीय पुरुष, ५८ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

पणदरे येथील ५४ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, सहा वर्षीय मुलगी, माऊलीनगर येथील ४० वर्षीय पुरुष, विद्यानगरी येथील ५ वर्षीय मुलगा, २६ वर्षीय महिला, बारामती शहरातील ४६ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील २१ वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील ३७ वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुष, ३९ वर्षीय पुरुष, जळोची येथील ३५ वर्षीय पुरुष, पणदरे येथील ६५ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

रूई येथील काल झालेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सूर्यनगरी येथील ४६ वर्षीय
पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कमल बजाज शोरूम पाठीमागे भिगवण रोड येथील ४८ वर्षीय पुरुष व्यवसायिक, बुरुडगल्ली येथील ५१ वर्षीय पुरुष, श्रीरामनगर भिगवण रोड येथील स्मृती अपार्टमेंट येथील ३० वर्षीय महिला, आरंभ सोसायटी टिसी कॉलेज शेजारी ४ वर्षीय मुलगी, ४ वर्षीय मुलगा, श्री प्रसाद अपार्टमेंट मार्केट यार्ड येथील ४९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जामदार रोड कसबा येथील २९ वर्षीय पुरुष, श्रीराम नगर येथील ५८ वर्षीय पुरुष, अनंत विहार टीसी कॉलेज समोरील ६५ वर्षीय पुरुष, मधुबन अपार्टमेंट भिगवण रोड येथील ४३ वर्षीय महिला, श्रीरामनगर भिगवण रोड येथील ५२ वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील ५६ वर्षीय पुरुष, गौरव अपार्टमेंट एमआयडीसीतील ३५ वर्षीय पुरुष, शारदा नगर येथील १९ वर्षीय युवकाचा समावेश आहे.

मोरगाव येथील ६२ वर्षीय पुरुष, लाटे येथील ६५ वर्षीय पुरुष, ढाकाळे येथील ५१ वर्षीय महिला, माळेगाव येथील ५६ वर्षीय पुरुष, सोनकसवाडी येथील ४५ वर्षीय पुरुष, त्याच बरोबर बारामतीतील कमल बजाज शोरूम पाठीमागील ४४ वर्षीय महिला, १७ वर्षीय युवक, कन्हैया अपार्टमेंट पाटस रोड येथील २९ वर्षीय महिला, ३८ वर्षीय पुरुष, मोता कलेक्शन सिनेमा रोड येथील ८९ वर्षीय व्यवसायिक, ऋतूसृष्टी अपार्टमेंट टिसी कॉलेजपाठीमागे प्रगतीनगर येथील ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ६८ झाली आहे.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७४७३ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६७५१ एकूण मृत्यू १४८.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button