बारामतीत आज कोरोनाचे 16 रुग्ण
शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढली
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज कोरोना ची एकूण संख्या 16 झाली आहे.
शासकीय rt-pcr 118 नमुन्यामधून 10 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 18 rt-pcr रुग्णांपैकी 3 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 30 नमुन्यांपैकी 3 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
शहरातील 10 तर ग्रामीण भागातील 6 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
ग्रामीणच्या तुलनेत शहरी भागात 4 ने रुग्णसंख्या वाढली आहे.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 5967 आहे तर बरे झालेले रुग्ण 5625 व एकूण मृत्यु 140 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा.अनावश्यक गर्दी टाळा