
बारामतीत आज कोरोना तीस च्या पटीत,
ग्रामीण व शहरी भागात रुग्णसंख्या सारखीच
बारामती वार्तापत्र
संपूर्ण राज्यातील अनेक ठिकाणी कोरोणाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. बारामतीतही आज ३० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बारामती शहर आणि बारामती ग्रामीण या दोन्ही ठिकाणी पंधरा-पंधरा अशी समान रुग्णसंख्या झालेले आहे. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागाचीही चिंता वाढत आहे
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये १७७ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह १० रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr २७ नमुन्यांपैकी १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या ३३ नमुन्यांपैकी एकूण ७ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ३० झाली आहे
बारामतीत काल शासकीय प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या पिंपळी येथील ४३ वर्षीय महिला, दहा वर्षीय मुलगी, एमआयडीसी येथील २१ वर्षीय महिला, संभाजीनगर येथील ५५ वर्षीय पुरुष, सावंतवस्ती येथील ४२ वर्षीय पुरुष, पणदरे येथील ६० वर्षीय महिला, सात वर्षीय मुलगी, माळेगाव येथील ३९ वर्षीय महिला, टि. सी. कॉलेज शेजारी ७० वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी खाजगी प्रयोगशाळेत तपासणी शारदानगर येथील ५१ वर्षीय महिला, धुमाळवाडी पणदरे येथील ४८ वर्षीय पुरुष, चोपडज येथील २९ वर्षे महिला, 38 वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील २५ वर्षीय पुरुष, माळेगाव येथील ४६ वर्षीय महिला, होळ येथील ४२ वर्षीय पुरुष, शारदानगर येथील ४१ वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.
निरावागज भिकू पाटील वस्ती येथील साठ वर्षीय पुरुष, देसाई इस्टेट येथील २७ वर्षीय पुरुष, खंडोबानगर कसबा येथील ४४ वर्षीय पुरुष, बुरुड गल्ली भगत हॉस्पिटल शेजारी ७२ वर्षीय पुरुष, खत्री इस्टेट येथील ३१ वर्षीय पुरुष, टाटीया इस्टेट पाटस रोड येथील ५६ वर्षीय पुरुष, तांदुळवाडी वेस येथील २८ वर्षीय पुरुष, अशोक नगर येथील ४८ वर्षे महिला, शारदा रेसिडेन्सी सूर्यनगरी येथील २४ वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ६ हजार ७०६ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६२९० एकूण मृत्यू १४५
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.