बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची पन्नाशी पार ,,
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ७०४२ वर गेली आहे.
बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची पन्नाशी पार ,,
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ७०४२ वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीत आज ५३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बारामती शहरात २९ आणि बारामती ग्रामीण मध्ये २४ रुग्णसंख्या झालेली आहे.
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये २५४ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह ३० रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr ३९ नमुन्यांपैकी १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या २२ नमुन्यांपैकी एकूण १० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ५३ झाली आहे.
बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये बारामती शहरातील ७० वर्षीय महिला, ८० वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील ५६ वर्षीय महिला, ८५ वर्षीय महिला, कमल बजाज शोरूम शेजारील २६ वर्षीय पुरुष, झारगडवाडी येथील ३६ वर्षीय पुरुष, सांगवी येथील ५६ वर्षीय पुरुष, २५ वर्षीय महिला, ४८ वर्षीय महिला, काटेवाडी येथील ३० वर्षीय पुरुष, येथील ४० वर्षे पुरुष, खंडोबा नगर येथील ७३ वर्षीय पुरुष, खांडज येथील ४० वर्षीय महिला, बऱ्हाणपुर येथील ४६ वर्षीय पुरुष, येथील ३५ वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.
सुपा येथील ३२ वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील ३२ वर्षीय महिला, २६ वर्षीय पुरूष, सुपा येथील ४७ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील १३ वर्षीय मुलगा, १७ वर्षीय मुलगा, तांबे नगर येथील २८ वर्षीय महिला, रुई येथील ३४ वर्षीय पुरुष, २७ येथील ६५ वर्षीय पुरुष, तांदुळवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष, घाडगे वस्ती येथील ६३ वर्षीय पुरुष, माळेगाव येथील ३० वर्षीय पुरुष, सुतार चाळ येथील ७० वर्षीय पुरुष, कल्याणी कॉर्नर येथील ३७ वर्षीय महिला, माळेगाव येथील ५१ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंंगललॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये पितृ पुण्याई बंगला अशोक नगर येथील २९ वर्षीय पुरुष, कांबळेश्वर बारावनगर येथील ३८ वर्षीय पुरुष, शिरष्णे येथील ६२ वर्षीय पुरुष, सांगवी येथील ५६ वर्षीय महिला, डोर्लेवाडी येथील ४७ वर्षीय पुरुष, सुपा येथील ४३ वर्षीय पुरुष, विजय इलेक्ट्रिकल तांदूळवाडी येथील ५१ वर्षीय महिला, डेंगळे गार्डन समोर कसबा येथील २७ वर्षीय पुरुष, स्प्रिंग विलेज तांदुळवाडी ३७ वर्षीय पुरुष, नंदिनी अपार्टमेंट दूध वसाहत साईनगर येथील २४ वर्षीय पुरुष, पद्मावती नगर जळोची येथील ७० वर्षीय पुरुष, तांदुळवाडी रोड येथील ६४ वर्षीय पुरुष, बुरुड गल्ली येथील ४२ वर्षीय महिला, रिंगरोड नंदराज अपार्टमेंट येथील २३ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७०४२ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६५२४ एकूण मृत्यू १४६.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.