
बारामतीत आज कोरोना रुग्णांची संख्या ३६
शहरी भागात रुग्णसंख्या वाढली
बारामती वार्तापत्र
संपूर्ण राज्यातील अनेक ठिकाणी कोरोणाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. बारामतीतही आज ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बारामती शहरात २४ आणि बारामती ग्रामीण मध्ये १२ रुग्णसंख्या झालेली आहे. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागाचीही चिंता वाढत आहे
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये १७६ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह २२ रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr २४ नमुन्यांपैकी ६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या ३१ नमुन्यांपैकी एकूण ८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ३६ झाली आहे
बारामती तालुक्यात काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत तपासणी आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तांदूळवाडी येथील ३४ वर्षीय पुरुष, मुढाळे येथील ५५ वर्षे पुरुष, सस्तेवाडी येथील चाळीस वर्षीय पुरुष, शारदा नगर येथील ४० वर्षीय महिला, कांबळेश्वर येथील ८२ वर्षीय पुरुष, उत्कर्ष नगर येथील १८ वर्षीय युवक, खत्री इस्टेट येथील तीस वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील ३६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
वसंतनगर येथील २७ वर्षीय पुरुष, वझरे येथील ३३ वर्षीय पुरुष, रामगल्ली येथील ५८ वर्षीय पुरुष, आमराई येथील ८३ वर्षीय महिला, तांदूळवाडी येथील १५ वर्षीय युवक, गुणवडी येथील ४५ वर्षीय महिला, पुरुष येथील १९ वर्षीय पुरुष, खंडोबानगर येथील २३ वर्षीय महिला, जळोची येथील ६० वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला, सहयोग सोसायटी येथील ४७ वर्षीय पुरुष, श्रीरामनगर येथील एकवीस वर्षीय पुरुष, शिरवली येथील २७ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील ३८ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
बारामतीत काल मंगल लॅबोरेटरी खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये देसाई इस्टेट येथील २७ वर्षीय पुरुष, खंडोबानगर वाबळे वाडा येथील ४४ वर्षीय पुरुष, भगत हॉस्पिटल बुरुड गल्ली शेजारी ७२ वर्षीय महिला, खत्री इस्टेट येथील ३१ वर्षीय पुरुष, टाटिया इस्टेट पाटस रोड येथील ५६ वर्षीय पुरुष, तांदुळवाडी वेळेस शेजारी २८ वर्षे पुरुष, अशोक नगर येथील ४८ वर्षीय महिला, शारदा रेसिडेन्सी येथील २४ वर्षीय पुरुष, शासकीय अधिकारी निवास बारामती येथील ४३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
पणदरे जगताप वस्ती येथील ५६ वर्षीय पुरुष, चोपडज येथील १३ वर्षीय मुलगी, अवधूत हाउसिंग सोसायटी तपोवन कॉलनी येथील ५० वर्षीय महिला, ५२ वर्षीय पुरुष, पार्थ सावली अपार्टमेंट रुई येथील ४४ वर्षीय पुरुष, कसबा येथील २६ वर्षीय पुरुष, माळेगाव येथील ६७ वर्षीय पुरुष व ५० वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आले आहेत, सूर्यनगरी येथील ३९ वर्षीय पुरुष, गुणवडी रोड येथील ४१ वर्षीय महिला, मॅजिक ग्रीन्सिटी येथील ३५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ६७४२ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६३१५ एकूण मृत्यू १४६
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.