बारामतीत आज तीन कोरोना पॉझिटिव्ह.
18 वर्षीय देसाई इस्टेट, व 24 वर्षे वयाचा तरूण सूर्यनगरी ,व जिल्हा नांदेड येथील एक 33 वर्षे वयाचा ड्रायव्हर जो दोन दिवसापूर्वी बारामतीला आला होता तो प्रगती नगर.
बारामतीत आज तीन कोरोना पॉझिटिव्ह.
18 वर्षीय देसाई इस्टेट, व 24 वर्षे वयाचा तरूण सूर्यनगरी ,व जिल्हा नांदेड येथील एक 33 वर्षे वयाचा ड्रायव्हर जो दोन दिवसापूर्वी बारामतीला आला होता तो प्रगती नगर.
बारामतीच्या प्रशासनाने आता कोरोनाला सर्वतोपरी रोखण्यासाठी कंबर कसली आहे, त्याचाच एक भाग म्हणजे आज सर्वोच्च उच्चांकी म्हणजे शतकाची मजल गाठली. सुमारे ११५ जणांचे कोरोनाचे नमुने तपासल्यानंतर आज बारामतीत तीनजण कोरोनाबाधित आढळून आले.
या कोरोनाबाधितांमध्ये सूर्यनगरी येथील २४ वर्षीय तरुणाचा समावेश असून देसाई इस्टेट मधील १८ वर्षीय तरुणासही कोरोनाची बाधा झाली आहे.
नांदेड येथून आलेल्या वाहन चालकासही कोरोनाची बाधा झाली असून तो दोन दिवसांपूर्वी बारामतीत प्रगती नगर. आला होता. त्याची तपासणी केल्यानंतर त्यास कोरोनाची बाधा आढळून आली आहे.
अर्थात कोरोनाचे बऱ्यापैकी नमुने निगेटिव्ह आल्याने प्रशासनालाच नाही, तर सामान्य बारामतीकरांनाही व बारामतीतील बाजारपेठेवर अवलंबून असणाऱ्या बारामती, इंदापूर, फलटण, करमाळा, पुरंदर तालुक्यातील नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला.
६९ पैकी ५९ जँणांचे अहवाल आले होते. ते निगेटिव्ह आले होते. १० जणांचे त्यातील अहवाल प्रलंबित होते. त्यात ३ जणांना कोरोनाची बाधा आढळली.
हे सर्व नमुने कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांचेच होते. त्यामुळे ते नेमके कसे येतात याची उत्सुकता सामान्य नागरिकांप्रमाणेच आरोग्य प्रशासनासही होती. आज दुपारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी बारामती वार्तापत्र बोलताना ही माहिती दिली. बारामतीत कोरोनाने साठी ओलांडली. आतापर्यंत ६५ कोरोनाग्रस्त आढळून आले असून सध्या ३७ कोरोनाग्रस्त अॅक्टीव्ह आहेत. हे सर्व अॅक्टीव्ह कोरोनाग्रस्त बारामती शहराशी संबंधित आहेत हे विशेष.