बारामतीत आज नवे तीन कोरोनाग्रस्त.
(एका राजकीय पदाधिकारी चा समावेश.)
कन्हेरीतील महिलेचा मृत्यू.
बारामती; वार्तापत्र
आज बारामतीत तालुक्यात कन्हेरीतील महिलेच्या मृत्यूसह नव्याने तीन कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यामध्ये तालुक्यातील एका राजकीय पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.
कन्हेरीतील कोरोनाग्रस्त महिलेचे निधन झाले. बारामती तालुक्यातील कोरोना ने घेतलेला नववा बळी आहे. कन्हेरी येथील 44 वर्षीय महिलेस थायरॉइडचा त्रास होत असल्याचे निमित्त होऊन तिला बारामतीतील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्यावर उपचार सुरू असतानाच कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने तिची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यामध्ये कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला बारामती हॉस्पिटल मधील कोरोना कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच तिचे निधन झाले.
दरम्यान काल घेण्यात आलेल्या 69 जणांच्या घशातील स्रावाच्या नमुन्यांपैकी 44 जणांचे अहवाल आले असून त्यामध्ये तीन जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. उर्वरित 25 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बारामतीतील शहरातील कसबा येथील पस्तीस वर्षे वयाचा तरुण तसेच शहरातील 85 वर्षाचा वृद्ध व गुरुकुल सोसायटी शिव नगर बारामती येथील 54 वर्षे राजकीय पदाधिकारी यांचा समावेश आहे .