पुणे

पिंपरीत पीएमपीएलच्या धावत्या बसने अचानक पेट,चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले 30 प्रवाशांचे प्राण

बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

पिंपरीत पीएमपीएलच्या धावत्या बसने अचानक पेट,चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले 30 प्रवाशांचे प्राण

बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड (पुणे) –प्रतिनिधी

दापोडी येथील पुलावर अचानक पीएमपीएलच्या बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच 30 प्रवाशांना बाहेर जाण्यास सांगितले. यामुळे या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही घटना बुधवारी (दि. 27) सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या बसच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. त्यानंतर बस बंद पडली, दरम्यान चालक लक्षण हजारे यांनी तातडीने प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर बसने पेट घेतला आणि आगिने रौद्ररुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच राहटणी आणि पिंपरी अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. बसचा पुढील भाग जळून खाक झाला आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button