बारामतीत आज 15 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
बारामती लोकसंख्या रुग्णसंख्या 556 झाली आहे.
बारामतीत आज 15 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
बारामती लोकसंख्या रुग्णसंख्या 556 झाली आहे,बरे झालेल्या रुग्णांची संख्या 310 आहे.
बारामतीतील भोई गल्ली येथील एका सत्तर वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाचा पुणे येथे उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे त्यामुळे मृत्यूंची संख्या 27 झालेली आहे.
बारामती वार्तापत्र
काल बारामतीत १०२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील ९७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बारामती शहरातील दोघांसह तालुक्यातील मूर्टी येथील एकाचा समावेश आहे.
आज ग्रामीण रुग्णालय रुई येथे शासकीय एंटीजेन टेस्ट सुरू झालेली आहे.
यामध्ये आज संध्याकाळपर्यंत ३८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी बारामती शहरातील तिघांसह माळेगाव आणि मूर्टी येथील प्रत्येकी एक अशा पाचजणांची चाचणी पॉझिटिव्ह आली.
बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण २० जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी बारामती शहरातील चार व ग्रामीण भागातील तीन असे सात रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बारामतीतील दिवसभरातील रुग्णांची संख्या १५ झाली आहे.
शहरात पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये विद्या हौसिंग सोसायटी च्या पाठीमागे भिगवन रोड येथील एक,सपना नगर येथील एक, पाटस रोड येथील एक,प्रगती नगर येथील एक, कल्याणी कॉर्नर येथील एक,वसंत नगर येथील एक, दत्तवाडी मोरगाव रोड टोलनाक्याजवळील एक, अमराई मधील एक व शहरातील एक असे नऊ जण व माळेगाव बुद्रुक येथील तीन, मूर्टी येथील दोन व वडगाव निंबाळकर मधील एक असे सहा रुग्ण असे एकूण 15 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.