बारामतीत आता अर्ध्या तासात कोरोना रिपोर्ट मिळणार.
रॅपिड अँटिजेंन टेस्ट ४ऑगस्ट पासून सुरू होणार.
बारामतीत आता अर्ध्या तासात कोरोना रिपोर्ट मिळणार.
रॅपिड अँटिजेंन टेस्ट ४ऑगस्ट पासून सुरू होणार.
बारामती:वार्तापत्र
बारामतीत उद्यापासून रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरु होणार..
बारामती शहरात ४ ऑगस्ट मंगळवार पासून रुई येथील कोविड केअर सेंटरमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट सुरु केली जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजयकुमार तांबे यांनी या बाबत माहिती दिली.
रँपिड अँटीजेन टेस्टमुळे अवघ्या अर्ध्या तासातच रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही हे समजणार असल्याने यंत्रणेवरचा ताणही आपोआपच कमी होणार आहे. ज्या रुग्णांना लक्षणे आहेत, अशा रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टमध्ये अहवाल निगेटीव्ह आला तर पुढील तपासण्या होणार नाहीत, मात्र रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तर त्याच्यावर लगेचच पुढील उपचार सुरु होणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तीन हजार रॅपिड अँटीजेन टेस्टचे किट उपलब्ध करुन दिले आहेत. अवघ्या अर्ध्या तासात याचा अहवाल येणार असल्याने लोकांना वाट पाहत बसावे लागणार नाही.
वैद्यकीय व्यावसायिकांना जे रुग्ण लक्षणे असलेले आहेत असे वाटते आहे, अशा रुग्णांच्या रॅपिड अँटीजन टेस्ट मंगळवारपासून सुरु केल्या जाणार आहेत. ज्या रुग्णांना लक्षणे आहेत, मात्र रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये तो रुग्ण निगेटीव्ह आला आहे त्याची आरटीपीसीआर (रिझर्व्ह ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर्स चेन रिअँक्शन टेस्ट) चाचणी केली जाणार आहे. मात्र, ज्याच्यामध्ये लक्षणे नाही व रॅपिड अँटीजन टेस्ट देखील निगेटीव्ह आली आहे, अशा रुग्णांची आरटीपीसीआर टेस्ट होणार नाही.
रुई येथे उद्यापासून लक्षणे असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांची स्वतंत्र रांग करुनच स्वॅब घेतले जाणार आहेत. या मुळे लक्षणे नसलेल्या लोकांना रिपोर्ट येण्यासाठी आठ दहा तास वाट पाहत बसावे लागणार नाही. बारामतीच्या दृष्टीने ही महत्वाची सुविधा असून यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेवरचा ताणही आपोआपच कमी होईल.