कोरोंना विशेष

बारामतीत इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे का? शहर आणि ग्रामिण मिळू. आज एकूण ३५ जण कोरोना संक्रमित

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ६६७६ वर गेली आहे.

बारामतीत इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे का? शहर आणि ग्रामिण मिळू. आज एकूण ३५ जण कोरोना संक्रमित

बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या ६६७६ वर गेली आहे.

बारामती वार्तापत्र

बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रूग्णां ची एकूण रुग्ण संख्या ३५ झाली आहे.

शासकीय rt-pcr १७२ नमुन्यामधून १६ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण २९ rt-pcr रुग्णांपैकी १० रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या ३२ नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह ०९ रुग्ण आहेत.काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १६+१०+०९=३५.

शहरातील २३ तर ग्रामीण भागातील १२ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.

बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या ६६७६ आहे तर बरे झालेले रुग्ण ६२८३ व एकूण मृत्यु १४५ इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

बारामतीत काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये काटेवाडी येथील ३ वर्षीय मुलगी, होळ ८ फाटा येथील ३४ वर्षीय महिला, पिंपळी येथील ४२ वर्षीय पुरुष, बारामती शहरातील ४५ वर्षीय महिला, २० वर्षीय पुरुष, शारदानगर येथील ६५ वर्षीय पुरुष, माऊलीनगर येथील ५२ वर्षीय पुरुष, जैनकवाडी येथील १३ वर्षीय मुलगी, निरावागज येथील ५२ वर्षीय पुरुष, चौधर वस्ती येथील २१ वर्षीय पुरुष, आयसीआयसीआय बँकेशेजारील ३५ वर्षीय महिला, कसबा येथील ४० वर्षीय महिला, बारामती शहरातील ३४ वर्षीय पुरुष, सूर्यनगरीतील ३८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

काल मंगल लॅबोरेटरी येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासलेल्या रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोरगाव येथील ५६ वर्षीय पुरुष, माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज शेजारील ४२ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथील ५५ वर्षीय महिला, सोमेश्वर नगर येथील ७० वर्षीय पुरुष, महावीर भवन खत्री इस्टेट शेजारील ३९ वर्षे पुरुष, प्रतिभा अपार्टमेंट मोतानगर येथील ५० वर्षीय पुरुष, देवळे कॉम्प्लेक्स मळद रोड सनराज बंगलो शेजारील ५२ वर्षीय पुरुष रूग्णाचा समावेश आहे.

सूर्यनगरी येथील श्री गणेश अपार्टमेंट मधील २८ वर्षीय महिला, भैरवनाथ मंदिर तांदुळवाडी शेजारील ६५ वर्षीय महिला, एम आय डी सीतील अभिमन्यू पार्क येथील ४० वर्षीय महिला, कोष्टी गल्ली येथील ५३ वर्षीय पुरुष, अमराई येथील देवकाते हॉस्पिटल शेजारील ५० वर्षीय महिला, मुक्ती व्हिलेज फेज वन येथील १८ वर्षीय युवती, कोष्टी गल्ली येथील ७५ वर्षीय महिला, पाटस रोड निसर्ग रेसिडेन्सी येथील २९ वर्षीय पुरुष, कोष्टी गल्ली येथील ४७ वर्षीय महिला, माळेगाव येथील ४० वर्षीय पुरुष, शासकीय रॅपिड एंटीजन चाचणीमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये रुई येथील ७९ वर्षीय पुरुष व एमआयडीसी येथील ५० वर्षीय महिला आढळून आले आहेत.

नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .

तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा

Related Articles

Back to top button