बारामतीत उद्या व्यवहार सुरळीत की बंद? नागरिकांमध्ये चर्चा
स्व अजित पवार बारामती बंद सारखी आवडत नव्हती

बारामतीत उद्या व्यवहार सुरळीत की बंद? नागरिकांमध्ये चर्चा
स्व अजित पवार बारामती बंद सारखी आवडत नव्हती
बारामती वार्तापत्र
ज्येष्ठ नेते अजित दादा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची आठवण काढली.
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर उद्या बारामती शहरात बंद पाळायचा की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही स्थानिक नागरिक, व्यापारी तसेच विविध संघटनांकडून स्वयंस्फूर्त बंदची चर्चा सुरू आहे. मात्र, या संदर्भात अधिकृत निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
बारामती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुशील सोमानी यांनी अद्याप आपली स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये संभ्रम कायम आहे. उद्या दुकाने सुरू ठेवायची की बंद ठेवायची, याबाबत अनेक व्यावसायिक साशंक आहेत.
काही नागरिकांच्या मते, अशा दुःखद प्रसंगी शहराने एकजूट दाखवत बंद पाळणे योग्य ठरेल. तर दुसरीकडे, सर्वसामान्य लोकांची दैनंदिन कामे, व्यवहार आणि व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह लक्षात घेता अचानक बंद पुकारणे योग्य नसल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.
शहरअध्यक्ष किरण इंगळे यांनी स्व अजित पवार बारामती बंद सारखी आवडत नव्हती.असे कालच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
एकूणच, उद्याच्या बंदबाबत अंतिम निर्णय काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अधिकृत घोषणा होईपर्यंत परिस्थिती अनिश्चितच आहे.






