बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन
काम उत्तम दर्जाचे करण्याच्या सूचना

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन
काम उत्तम दर्जाचे करण्याच्या सूचना
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेच्यावतीने सर्वे नं. 220 येथे दुर्गा टॉकिजच्या समोर कमर्शियल कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरु करण्यात येत आहे. या ठिकाणचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पहाटे पावणे सहा वाजता बारामतीतील विविध विकास कामांचां पाहणी दौरा केलाय. या नंतर बारामती परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच तसेच उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडली.
पाहणी दौरा नंतर बारामतीतील अनंत आशा नगर येथील सर्वे नंबर २२० येथील शॉपिंग कॉम्प्लेक्सचा भूमिपूजन समारंभ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम हे उत्तम दर्जाचे झाले पाहिजेत अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनास दिल्या. या दरम्यान अनंत आशा नगर येथील परिसरातील नागरिकांच्या वीज आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावा अशा सूचना देखील दिल्या.
शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या भूमिपूजन दरम्यान उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, गटनेते सचिन सातव, नगरसेविका शीतलताई गायकवाड, नगरसेवक कुंदन लालबिगे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, नगरसेवक राजेंद्र बनकर, नगरसेवक सत्यव्रत काळे, युवक अध्यक्ष अमर धुमाळ, अँड धीरज लालबिगे, पत्रकार सुरज देवकाते ,संदीप पवार, बाळासाहेब देवकाते, गणेश जाधव, युवराज खीराडे, अमोल शिंदे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.