स्थानिक

बारामतीत ‘ओटीपी’च्या नावाखाली फसवणुकीची भीती; एअरटेल करतय आरबीआयच्या नियमांच उल्लघन?

अनेक नागरिकांनी विश्वास ठेवून हा ओटीपी दिल्याची शक्यता व्यक्त

बारामतीत ‘ओटीपी’च्या नावाखाली फसवणुकीची भीती; एअरटेल करतय आरबीआयच्या नियमांच उल्लघन?

अनेक नागरिकांनी विश्वास ठेवून हा ओटीपी दिल्याची शक्यता व्यक्त

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात सध्या इंटरनेट व वाय-फाय कनेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असताना, काही ठिकाणी संशयास्पद प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. वाय-फाय कनेक्शन देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून ‘ओटीपी’ (One Time Password) मागितला जात असल्याचे प्रकार उघड होत असून, त्यामुळे फसवणुकीची भीती निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,काही व्यक्ती स्वतःला एअरटेल कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून नागरिकांच्या घरी किंवा फोनवर संपर्क साधत आहेत. “आपल्याला वाय-फाय कनेक्शन देण्यासाठी इंस्टॉलेशन प्रक्रिया सुरू आहे, त्यासाठी आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी द्या,” असे सांगून नागरिकांकडून ओटीपी घेतला जात आहे.

अनेक नागरिकांनी विश्वास ठेवून हा ओटीपी दिल्याची शक्यता व्यक्त होत आहे. जर एअरटेल कंपनीच्या नावाखाली जर कोणी ओटीपी मागितला आणि फसवणूक झाली तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे

मात्र, बँकिंग व आर्थिक व्यवहारांसंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून स्पष्टपणे सूचना देण्यात आल्या आहेत की, कोणत्याही परिस्थितीत फोनवर किंवा अनोळखी व्यक्तींना ओटीपी सांगू नये.

ओटीपी हा अत्यंत गोपनीय असतो आणि तो केवळ संबंधित व्यवहार पूर्ण करण्यासाठीच वापरला जातो.
तज्ञांच्या मते, अशा प्रकारे ओटीपी मिळवून संबंधित व्यक्ती नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश मिळवू शकतात किंवा त्यांच्या नावावर अनधिकृत व्यवहार करू शकतात.

त्यामुळे एअरटेल कंपनीच्या नावाचा गैरवापर करून सायबर फसवणुकीचे प्रकार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या प्रकारामुळे बारामतीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे.

नागरिकांनी कोणतीही सेवा घेण्यापूर्वी संबंधित कंपनीची अधिकृत ओळख पटवून घ्यावी, तसेच ओटीपी, बँक डिटेल्स किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

पोलीस प्रशासनानेही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारचे फोन किंवा भेटी आल्यास त्वरित तक्रार नोंदवावी, असे सांगितले आहे. सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी जागरूकता हाच सर्वोत्तम उपाय असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सावधगिरीचे उपाय :

कोणालाही ओटीपी देऊ नका अनोळखी कॉल्सवर विश्वास ठेवू नका कंपनीचे अधिकृत आयडी व ओळख तपासा संशयास्पद प्रकार त्वरित पोलिसांना कळवा बारामतीत वाढत चाललेल्या या प्रकारांमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button