बारामतीत कचरागाडीने माजी उपनगराध्यक्षांना दिली धडक; मद्यधुंद चालकाचा प्रताप
खासगी रुग्णालयात उपचार सुरू

बारामतीत कचरागाडीने माजी उपनगराध्यक्षांना दिली धडक; मद्यधुंद चालकाचा प्रताप
खासगी रुग्णालयात उपचार सुरू
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा ज्योती नवनाथ बल्लाळ यांच्यासह इतर दोन महिलांना बारामती नगरपालिकेच्या मद्यधुंद चालकाने कचरा संकलन करणाऱ्या गाडीने ठोकल्याची घटना बारामतीत घडली आहे.
या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी सुनीता लोंढे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, बारामतीच्या माजी उपनगराध्यक्षा ज्योती नवनाथ बल्लाळ या बारामती शहारातील गणेश भाजी मार्केटमध्ये संक्रांतीची खरेदी करीत असताना नगरपालिकेच्या ठेक्यावर असलेल्या एनडीके नामक कंपनीच्या कचरा संकलन करणाऱ्या गाडीच्या चालकाने मागे खरेदी करीत उभ्या असलेल्या माजी उपनगराध्यक्षा आणि त्यांच्या इतर दोन महिला सहकारी यांना कचरा संकलन करणारी गाडी रिव्हर्स घेऊन ठोकरले.
त्यामुळे तीनही महिला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. तर मद्यधुंद अवस्थेत गाडी का चालवतो, असा जाब विचारला असता चालकाने उलट उत्तर देऊन चक्क माजी उपनगराध्यक्षांनाच अरेरावी केल्याचा प्रकार बारामतीत घडला आहे. या प्रकरणी आरोपी योगेश चव्हाण, शेखर पवार, विनायक शिंदे यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित चालकांसह ठेकेदारावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी केली आहे.
एक कार भरधाव वेगात आली अन् टिळक रस्त्यावरील…; वाचा ‘ही’ धक्कादायक घटना
पुण्यातील टिळक रोडवरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात भरधाव कार नियंत्रण सुटल्याने घुसली अन् मोठी घटना घडली. रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. यावेळी क्रेन बोलवून कार बाहेर काढण्यात आली आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौकत कमलाकर बेळ (वय १९, रा. हडपसर काळेपडळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शौकत बेळचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी फुटपाथवर चढली. आणि नंतर कार महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक दुकानात शिरली. यावेळी दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. यावेळी चालकासोबत त्याचे दोन मित्र देखील गाडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता का ? अशी विचारणा पोलिसांना केली असता त्यांनी चालकाने मद्य प्राषण केले नसल्याचे म्हटले.
हेही वाचा:
महिला पोलिसाला कारने उडवले
राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली.
यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजन असल्याचे माहिती समोर आली. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.