बारामतीत कर्णबधीर मुलांसाठी श्रवणयंत्र तपासणी व वितरण शिबिर; १५८ लाभार्थ्यांची तपासणी, ३१४ श्रवणयंत्रांचे वाटप
मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून

बारामतीत कर्णबधीर मुलांसाठी श्रवणयंत्र तपासणी व वितरण शिबिर; १५८ लाभार्थ्यांची तपासणी, ३१४ श्रवणयंत्रांचे वाटप
मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून
बारामती वार्तापत्र
खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहरात कर्णबधीर मुलांसाठी श्रवणयंत्र पूर्व तपासणी व वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सेंटर,ठाकरसी ग्रुप आणि सिकोर एड्स प्रा ली यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यालयात पार पडले.
या शिबिराला युवा नेते युगेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
समाजातील कर्णबधीर मुलांना ऐकण्याची क्षमता मिळावी आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिरामध्ये एकूण १५८ लाभार्थ्यांची तज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पात्र ठरलेल्या मुलांना आणि नागरिकांना तब्बल ३१४ श्रवणयंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले.
श्रवणयंत्र मिळाल्यानंतर अनेक मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. एखाद्या कर्णबधीर मुलाच्या कानात पहिल्यांदाच आवाज पोहोचतो, तेव्हा तो केवळ आवाज नसतो तर त्या मुलाच्या आयुष्यात आशा, आनंद आणि नव्या सुरुवातीचा क्षण असतो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या उपक्रमाबाबत बोलताना आयोजकांनी सांगितले की, राजकारण म्हणजे केवळ भाषणे करणे नसून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे हेच खरे जनसेवेचे कार्य आहे. अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू नागरिकांना मोठा आधार मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते सतीश मामा खोमणे,राजेंद्रबापू जगताप, वनिताताई बनकर, नगरसेविका आरती शेंडगे-गव्हाळे, गणपत आबा देवकाते, पैगंबर शेख, प्रशांत बोरकर, ॲड. बळवंत बेलदार पाटील, प्रियांका शेंडकर, अमीर मुलाणी, विनायक शेळके, विठ्ठल करे, धनराज निंबाळकर, श्री तावरे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्णबधीर मुलांच्या आयुष्याला आवाज देण्याचा हा छोटासा परंतु माणुसकीचा मोठा प्रयत्न असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून समाजाभिमुख कार्याची एक सकारात्मक पावले म्हणून या शिबिराचे कौतुक होत आहे.






