बारामतीत कार्यक्रम जोमात मात्र विकेंड लॉकडाऊनमुळे व्यापारी कोमात
बारामती पुन्हा विक ली लॉक डाऊन शनिवार रविवार राहणार बारामती पूर्ण बंद:

बारामतीत कार्यक्रम जोमात मात्र विकेंड लॉकडाऊनमुळे व्यापारी कोमात
बारामती पुन्हा विक ली लॉक डाऊन शनिवार रविवार राहणार बारामती पूर्ण बंद:
बारामती वार्तापत्र
बारामती शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी उद्यापासून निर्बंधामध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये आता शनिवारी आणि रविवारी वैद्यकीय सेवा वगळता सर्व आस्थापना दुकाने बंद राहतील. असा निर्णय आज स्थानिक प्रशासनाने घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे. कसल्याही परिस्थितीत पॉझिटिव्हीटी रेट कमी होणे गरजेचे आहे. कोरोना बधितांशी संपर्क वाढला की रूग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वार्ड निहाय सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.
बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करणे, त्यांचे विलगिकरण होणे आवश्यक आहे. प्रशासनास पूर्ण अधिकार दिले आहेत, स्थानिक पातळीवर प्रशासनाने त्याचा वापर करावा. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. म्युकरमायकोसीस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी.असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बारामती मध्ये काल झालेल्या तपासण्यांमध्ये 63 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. वस्तुतः बारामतीतील रुग्णसंख्या जुलै महिन्याच्या सुरुवातीस देखील कमी आली होती, परंतु पुन्हा दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असताना बारामतीतून दुसरी लाट संपता संपत नाही असे चित्र निर्माण झाले आहे.
त्यामुळेच ही परिस्थिती लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनास कठोर निर्बंध लादण्याचा सूचना दिल्या होत्या. त्याचा अंतर्भाव करत आता शनिवारी व रविवारी संपूर्ण विकेंड लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बारामती व्यापारी महासंघाने देखील शनिवारी व रविवारी पूर्णतः लॉक डाऊन होणार असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.
बारामतीतील या विकेंड लॉक डाऊन मुळे व्यापारी महासंघ चे अध्यक्ष नरेंद्र गुजराती यांनी व्यापारी महासंघाच्या वतीने नाराजी व्यक्त केली असून बारामती मध्ये कोरोणा रुग्ण कमी प्रमाणात असताना देखील बारामतीकरांना विकेंड लॉक डाऊन चा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागामध्ये रुग्ण वाढ होत आहे. शहरी भागातील व्यापारी सर्व नियमाचे पालन करून ही दुकाने चालवत असताना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे मत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराती यांनी नोंदवले.
बारामतीत विकेंड लोक डाऊन घोषणा झाली असल्याने समस्त व्यापारी वर्ग नाराज असून मात्र नेतेमंडळींच्या वाढदिवसाचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरे करताना दिसत आहे लॉक डाऊन फक्त व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे का असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला गेला.