बारामतीत काल दिवसभरात मिळाले एकुण ५४ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 3125 वर गेली आहे.
बारामतीत काल दिवसभरात मिळाले एकुण ५४ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 3125 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
दिनांक 26/ 9 /20 रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या 36 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 01 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असून उर्वरित नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तसेच कालचे (27/09/20) एकूण rt-pcr नमुने 104. एकूण पॉझिटिव्ह- 34. प्रतीक्षेत 00. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -02. काल खाजगी प्रयोग शाळेमार्फत तपासलेले एकूण rt-pcr-30 त्यापैकी पॉझिटिव्ह -07 कालचे एकूण एंटीजन 43. एकूण पॉझिटिव्ह-12 . काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 01+34+07+12=54. शहर-26 . ग्रामीण- 28. एकूण रूग्णसंख्या-3125 एकूण बरे झालेले रुग्ण- 2226 एकूण मृत्यू– 76.
बारामतीमधील शासकीय तपासणीदरम्यान आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये साळवेनगर येथील ४४ वर्षीय पुरूष, खंडोबानगर येथील ३४ वर्षीय पुरूष, झारगडवाडी येथील ५ वर्षीय मुलगी, भोईटे हॉस्पिटल येथील ३६ वर्षीय पुरूष, अवचट इस्टेट येथील ४३ वर्षीय पुरूष, ४६ वर्षीय पुरूष, कसबा येथील ३२ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
जामदार रोड येथील २७ वर्षीय पुरूष, समर्थनगर येथील २३ वर्षीय युवक, पिंपळी येथील १७ वर्षीय युवक, २४ वर्षीय युवक, वाणेवाडी येथील २१ वर्षीय युवक, २० वर्षीय युवक, ४६ वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील २७ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
आमराई येथील २७ वर्षीय महिला, जळोची येथील १० वर्षीय मुलगी, ४४ वर्षीय पुरूष, ५ वर्षीय मुलगा, गोजुबावी येथील ४० वर्षीय महिला, ५६ वर्षीय पुरूष, शिरष्णे येथील ५३ वर्षीय महिला, सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील ५५ वर्षीय अधिकारी, सावळ येथील ३२ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
कल्याण कॉर्नर येथील ४२ वर्षीय पुरूष, सावळ येथील ४० वर्षीय महिला, सांगवी येथील ४८ वर्षीय महिला, झारगडवाडी येथील ३० वर्षीय पुरूष, खंडोबानगर येथील ३३ वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, कोऱ्हाळे येथील ५० वर्षीय पुरूष, जळोची येथील ३५ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील शासकीय रॅपीड अॅंटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोरेश्वर येथील ५३ वर्षीय पुरूष, कवी मोरोपंत सोसायटीतील ३८ वर्षीय पुरूष, वंजारवाडी येथील ६५ वर्षीय पुरूष, माळेगाव येथील २७ वर्षीय पुरूष, मुरूम येथील ३३ वर्षीय पुरूष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३५ वर्षीय महिला, एमआयडीसी येथील २९ वर्षीय पुरूष, पिंपळी येथील २१ वर्षीय युवक व आयएसएमटी येथील ३२ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
बारामतीतील खासगी मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या कोरोनाबाधितांमध्ये कारभारी नगर कसबा येथील ५५ वर्षीय पुरूष, सूर्यनगरी येथील चंद्रभागा निवास येथील २८ वर्षीय पुरूष, शिवनगर येथील ३० वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
मंगल लॅबोरेटरी येथे नव्याने आरटीपीसीआर तपासणी सुरू झाली आहे, या तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये तांदूळवाडी येथील ३३ वर्षीय पुरूष, स्वामी विवेकानंदनगर येथील समर्थ बंगला येथील ५० वर्षीय पुरूष, मोतीबाग येथील ७२ वर्षीय पुरूष, काऱ्हाटी येथील ४५ वर्षीय पुरूष, ७४ वर्षीय पुरूष, सांगवी येथील ५२ वर्षीय पुरूष, माळेगाव बुद्रुक येथील ५६ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश
काल बारामतीत तपासणी झालेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये इंदापूर तालुक्यातील दोघांचा समावेश असून यामध्ये भवानीनगर येथील ४५ वर्षीय पुरूष, काझड येथील २८ वर्षीय पुरूष रुग्णाचा समावेश आहे.