राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली अभिनेत्री केतकी चितळेवर शाईफेक
कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली अभिनेत्री केतकी चितळेवर शाईफेक
कलम 500, 505 (2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल
क्राईम;बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारयांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका करणाऱ्या पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे चर्चेत आली होती. कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनीकेतकी चितळेला ताब्यात घेतले आहे. केतकी चितळे सायंकाळी 4.30 वाजल्यापासून कळंबोली पोलिसांच्या ताब्यात असून कळंबोली पोलीस चितळेला ठाणे पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत. दरम्यान, केतकी चितळेवर शाईफेक करण्यात आली आहे.
पोलीस केतकीला गाडीत बसवत होते. या दरम्यान आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संधी साधून केतकीवर शाई आणि अंडी फेकली. इतकंच नाही तर तिला मारहाण करण्याचाही प्रयत्न केला.या वेळेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले दिसून आले. ‘केतकी चितळे हाय हाय’ अशा घोषणाही यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.
या सर्व गडबडीत केतकी पोलिसांच्या गाडीत बसताना खाली पडली. तसेच शाईफेक केल्यानंतरही केतकी हसत असल्याचं दिसून आलं. दरम्यान आता पोलीस केतकी विरुद्ध काय कारवाई करतात, याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं लक्ष लागून राहिलं आहे.