बारामतीत कोरोनाचा कहर आज पर्यंतचा उच्चांक, काल एकुण बाधित २३८. तर दोघांचा मृत्यू.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 10155

बारामतीत कोरोनाचा कहर आज पर्यंतचा उच्चांक, काल एकुण बाधित २३८. तर दोघांचा मृत्यू.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 10155
बारामती वार्तापत्र
बारामतीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.आज तर बारामतीतील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने दोनशेचा आकडा पार केला आहे.त्यामुळे आता सर्वसामान्य बारामतीकरांची चिंता कमालीची वाढली आहे.बारामतीतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून देखील युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
शासकीय rt-pcr 437 नमुन्यामधून 144 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या एकूण 105 rt-pcr रुग्णांपैकी 45 रुग्ण पॉझिटिव्ह आले. एंटीजन च्या 101 नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह 49 रुग्ण आहेत.
शहरातील 155 तर ग्रामीण भागातील 83 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.
बारामतीत विविध तपासण्यांमधून आढळलेल्या कोरोना ग्रस्तांमध्ये मळद येथील एकाच कुटुंबातील पाच जण कोरोना बाधित आढळले असून यामध्ये येथील 27 वर्षीय पुरुष, 90 वर्षीय पुरुष, सहा वर्षीय मुलगी, 26 वर्षीय महिला, नऊ वर्षीय मुलगा कोरोना बाधित आढळून आले आहेत.
झारगडवाडी येथील 19 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, बांदलवाडी येथील 43 वर्षीय महिला, पणदरे येथील 12 वर्षीय मुलगा, वडगाव निंबाळकर येथील वीस वर्षीय पुरुष, चोपडज येथील 34 वर्षीय पुरुष, सदोबाचिवाडी येथील तीस वर्षीय महिला, वडगाव निंबाळकर येथील 56 वर्षीय पुरुष, सोमेश्वर नगर येथील 53 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
कोर्हाळे खुर्द येथील 28 वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील 23 वर्षीय पुरुष, पिंपळी येथील 16 वर्षीय मुलगी, लिमटेक येथील 41 वर्षीय महिला, कन्हेरी येथील 68 वर्षीय पुरुष, मुढाळे येथील 20 वर्षीय पुरुष, जळगाव कडेपठार येथील 39 वर्षीय पुरुष, मुढाळे येथील 22 वर्षीय महिला, मेडद येथील 70 वर्षीय महिला, 29 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जळगाव कडेपठार येथील 30 वर्षीय पुरुष, फोंडवाडा येथील 66 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, मेडद येथील 25 वर्षीय पुरुष, जळकेवाडी येथील 26 वर्षीय पुरुष, येथील 78 वर्षीय पुरुष, खराडेवाडी येथील 32 वर्षीय पुरुष, कारखेल येथील 58 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, नारोळी येथील 26 वर्षीय पुरुष, सुपा येथील 47 वर्षीय महिला, 52 वर्षीय पुरुष, देऊळगाव रसाळ येथील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तरडोली येथील 61 वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील 36 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, भिकोबानगर येथील 60 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 24 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 57 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 35 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय पुरुष, कोऱ्हाळे बुद्रुक येथील 39 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
माळेगाव बुद्रुक येथील तीस वर्षीय पुरुष, पाहुणेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 32 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, पणदरे येथील 12 वर्षीय मुलगा, 50 वर्षीय महिला, निरावागज येथील 18 वर्षीय युवक, 70 वर्षीय पुरुष, शिरवली तुपे वस्ती येथील 40 वर्षीय पुरुष, सांगवी येथील 52 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरुष, गोजुबावी येथील 40 वर्षीय पुरुष, पारवडी येथील 31 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला, कटफळ येथील 53 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
बारामतीतील आज पर्यंत चे एकूण रुग्ण संख्या 10155 आहे तर बरे झालेले रुग्ण 8364 व एकूण मृत्यु 167 इतकी संख्या आहे.
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे .
तुम्ही घरी रहा, सुरक्षित रहा घाबरू नका ,काळजी घ्या
तोंडाला मास्क लावा , सॅनिटायझर चा वापर करा. अनावश्यक गर्दी टाळा