कोरोंना विशेष

बारामतीत कोरोनाची परत डबल सेन्च्युरी.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 9753

बारामतीत आजची रुग्णसंख्या 209 वर, दिवसेंदिवस बाधीतांची संख्या वाढतेय, काळजी घ्या ! तर 3 जणांचे मृत्यू

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या 9753

बारामती वार्तापत्र

दि.31/3/2021 चे प्रतिक्षेत असलेले 200 पैकी 15 पाॅझिटीव्ह. आणि कालचे 1/4/2021 चे 194 असे एकुण 209 जण कोरोना बाधीत, तर तिघांना देवाज्ञा.

बारामती शहरात 117 आणि बारामती ग्रामीण मध्ये 77 रुग्ण

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 504 नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह 107 रुग्ण आहेत ,
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 72 नमुन्यांपैकी 48 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या 73 नमुन्यांपैकी एकूण 39 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

.बारामती मध्ये रुग्ण दाखल करून घेण्यासाठी प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. अर्थात बारामतीमध्ये राज्यातील सर्वाधिक तपासण्या होत असल्याने, देखील कोरोनाचे रुग्ण दिसत आहेत. इतर तालुक्यांमध्ये अशा प्रकारची तपासणी एवढ्यात मोठ्या प्रमाणावर होत नाही, परंतु तरीदेखील बारामतीत दररोज रुग्ण वाढत चाललेले आहेत.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 194 झाली आहे.

बारामतीतील कोरोना ग्रस्तांची रुग्णसंख्या आता दहा हजाराकडे चालली असून आजपर्यंत 9753 जण कोरोना बाधित झाले आहेत.  तर एकूण बरे झालेले रुग्ण 8142 एकूण मृत्यू 165.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button