बारामतीत कोरोनाची माघार ,, आज ४१ रुग्ण पॉझिटिव्ह
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७५८६

बारामतीत कोरोनाची माघार ,, आज ४१ रुग्ण पॉझिटिव्ह
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७५८६
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात २४ आणि बारामती ग्रामीण मध्ये १७ रुग्णसंख्या झालेली आहे.
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये १४५ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह २३ रुग्ण आहेत
तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 38 नमुन्यांपैकी १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर एंटीजनच्या १८ नमुन्यांपैकी एकूण ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ४१ झाली आहे.
बारामतीत काल झालेल्या शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये एमआयडीसी येथील ३० वर्षीय महिला, मालेगाव बुद्रुक येथील २६ वर्षीय पुरुष, पवईमाळ येथील २७ वर्षीय महिला, संघवीनगर येथील ६ वर्षीय मुलगा, ५६ वर्षीय पुरुष, पणदरे येथील २६ वर्षीय पुरुष, श्रावणगल्ली येथील ७५ वर्षीय महिला, २२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
मळद येथील ३१ वर्षीय पुरुष, टीसी कॉलेज शेजारील १४ वर्षीय मुलगा, कऱ्हावागज येथील ४० वर्षीय पुरुष, श्रावणगल्ली येथील ५४ वर्षीय पुरुष, ४२ वर्षीय महिला, मुढाळे येथील ६८ वर्षीय पुरुष, रोड येथील ३४ वर्षीय पुरुष, अंजनगाव येथील ३१ वर्षीय पुरुष, रुई येथील ३६ वर्षीय महिला, एमआयडीसी येथील ३३ वर्षीय पुरुष, येथील ३६ वर्षीय महिला, विद्यानगरी येथील २८ वर्षीय महिला, मुढाळे येथील ७ वर्षीय मुलगी, पारवडी येथील ४३ वर्षीय पुरुषळ मळद येथील ३५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीत काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे तपासलेल्या विविध नमुन्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये भिकोबा नगर पणदरे येथील ६५ वर्षीय पुरुष, शारदा नगर येथील ५८ वर्षीय पुरुष, सत्य साई नगर बांदलवाडी येथील ३२ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय महिला, निरावागज येथील ५५ वर्षीय महिला, सावळ येथील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
विश्व एम्पायर भिगवण रोड येथील ४३ वर्षीय पुरुष, फुलचंद हाऊस कॅनॉल रोड येथील ६३ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय पुरुष, नेवसे रोड येथील ८३ वर्षीय पुरुष, समर्थ नगर गुणवडी येथील ५० वर्षीय पुरुष, नेवसे रोड येथील २८ वर्षीय पुरुष, संघवी पार्क येथील २९ वर्षीय महिला, कृष्णकुंज बिल्डिंग सुभाष चौक येथील ५७ वर्षीय पुरुष, श्लोक अपार्टमेंट अशोक नगर येथील ६९ वर्षीय महिला, कृष्णा हार्डवेअर नेवसे रोड येथील ४८ वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ७५८६ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६७८१ एकूण मृत्यू १४८.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.