
बारामतीत कोरोना विशी च्या आत
ग्रामीण भागातील रुग्ण आज वाढले
बारामती वार्तापत्र
काल बारामतीत 11 रुग्ण पॉझिटिव आले होते. त्यात आज वाढ होत एकूण रुग्ण संख्या 18 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
शासकीय rt-pcr नमुन्यांमधून 70 नमुने तपासण्यात आले .त्यातील 6 नमुने पॉझिटिव आले असून, तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr नमुने अठरा होते त्यापैकी 5 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत
तसेच एंटीजन तपासनीत एकूण 38 नमुने होते त्यापैकी 7 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बारामतीतील आजची रुग्णसंख्या 18 असून यामध्ये शहरातील 5 तर ग्रामीण भागातील 13 रुग्णांचा समावेश आहे.
काल आढळून आलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये मंगल लॅबोरेटरी मध्ये झालेल्या तपासणीत माळेगाव बुद्रुक येथील 36 वर्षीय पुरुष, नागेश्वरनगर माळेगाव येथील तीस वर्षीय महिला, विद्यानगर माळेगाव येथील 45 वर्षीय महिला, निरावागज येथील 66 वर्षीय महिला, माळेगाव बुद्रुक येथील 26 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल झालेल्या शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये श्रीरामगल्ली येथील 27 वर्षीय पुरुष, मेडद येथील 28 वर्षीय पुरुष, पतंगशहानगर येथील 26 वर्षीय पुरुष, ढेकळवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 24 वर्षीय महिला वडगाव निंबाळकर येथील 76 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.
काल झालेल्या शासकीय रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये सणसर इरिगेशन बंगला येथील 36 वर्षीय पुरुष, सूर्य नगरीतील 47 वर्षीय महिला, 17 वर्षीय युवक यांचा समावेश आहे.
आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या 5690 तर,, बरे झालेले रुग्ण संख्या 5343 व एकूण मृत्यू 136 असे आहेत.
तुम्ही घरी राहा, घाबरू नका, काळजी घ्या तोंडाला मास्क लावा, सॅनिटायझर चा वापर करा , अनावश्यक गर्दी टाळा