स्थानिक

बारामतीत खळबळ:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर अघोरी पूजेचा प्रकार

निवडणुकीच्या तोंडावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू

बारामतीत खळबळ:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर अघोरी पूजेचा प्रकार

निवडणुकीच्या तोंडावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू

बारामती वार्तापत्र 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील ‘सहयोग’ या निवासस्थानासमोर आज संशयास्पद आणि अघोरी स्वरूपाचा पूजेचा प्रकार आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

निवासस्थानाच्या सोसायटीच्या मुख्य गेटजवळ जमिनीवर लिंबू, मिरची, काळे कापड, काही धार्मिक साहित्य तसेच उताऱ्यासारखी वस्तू ठेवलेली दिसून आली. हा प्रकार दिसताच सोसायटीतील रहिवाशांनी त्वरित स्थानिक सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध चर्चा

या घटनेमुळे विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार हे बारामतीसह राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते असल्याने त्यांच्या घरासमोर असा प्रकार घडणे गंभीर मानले जात आहे.

स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळांमध्ये खालील शक्यता चर्चेत आहेत:

उमेदवारी मिळवण्यासाठी किंवा प्रतिस्पर्ध्याचे तिकीट कापण्यासाठी ‘भानामती’चा प्रयत्न केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.

काहींच्या मते, हा प्रकार केवळ गैरसमज निर्माण करण्याचा किंवा मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्नही असू शकतो.

तर काही रहिवाशी याला विधी-विधाने किंवा अंधश्रद्धेचा भाग असल्याचे मानत आहेत.काही जणांनी याला “अघोरी पूजा” असे संबोधले, तर काहींनी “अंधश्रद्धेचा कृती” म्हणून दुर्लक्ष केले.तथापि,या सर्वांमुळे परिसरात चर्चा रंगल्या असून,नगरपालिका निवडणूक वातावरणात या घटनेला अतिरिक्त राजकीय रंग चढत आहे.

Back to top button