स्थानिक
बारामतीत चार दिवसानंतर लसीकरणाला झाली सुरुवात.. महिला ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी..
दुसऱ्या डोससाठी 450 नागरिकांना आज फोन करून बोलावण्यात आले होत

बारामतीत चार दिवसानंतर लसीकरणाला झाली सुरुवात.. महिला ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी..
दुसऱ्या डोससाठी 450 नागरिकांना फोन करून बोलावण्यात आले होत
बारामती वार्तापत्र
बारामतीतील महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण भागातील सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात चार दिवसानंतर लसीकरणाला सुरुवात झाली आहे.. यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी महिला ग्रामीण रुग्णालयात गर्दी केलीय.. लस कमी प्रमाणात असल्याने शासनाच्या नवीन नियमावली नुसार कोविडशिल्ड चा पहिला डोस घेवुन ज्यांचे 84 दिवस आणि कॉवक्सिनचा पहिला डोस घेऊन ज्यांचे 28 दिवस पूर्ण झाले आहेत त्यांनाच लसीकरण होत असल्याने अनेक जेष्ठ नागरिकांना लस न घेताच घरी परतावे लागले आहे..
दुसऱ्या डोससाठी 450 नागरिकांना आज फोन करून बोलावण्यात आले आहे त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी फोन आल्याशिवाय लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करू नये असे आवाहन वैधकीय अधिकारी डॉ सदानंद काळे यांनी केले आहे..