क्राईम रिपोर्ट

बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या आरोपी विरूध्द कारवाई

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला

बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या आरोपी विरूध्द कारवाई

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला

क्राईम ; बारामती वार्तापत्र

बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिरवली गावचे हद्दीत तुकाई मंदीराचे जवळ आरोपी नामे  ओंकार बाळासो आडके,रा.शिरवली, ता. बारामती, जि.पुणे. यांनी त्यांचे राहते घराच्या शेजारी गुरांच्या गोठयाजवळ २०० लिटर मापाचे ६ प्लास्टीक बॅरल गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन असा एकुण १,३५,०००/- रूपये किंमतीच्या मुद्देमाला सह
मिळुन आले आहे.

म्हणुन बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी वरील आरोपी यांचे विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील गुन्हयाचा तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

Back to top button