पुणे
बारामतीत ज्याच डिपॉझिट जप्त झालं त्याच्याबद्दल काय बोलू – उपमुख्यमंत्री अजित पवार
मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, तुम्ही कोणाबद्दल विचारताय, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा अनुल्लेख केला.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट
मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, तुम्ही कोणाबद्दल विचारताय, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा अनुल्लेख केला. ते पुण्यात बोलत होते. पुण्यात वीकेंड लाकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यावेळी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांना उत्तरं दिली.
यावेळी अजित पवारांना गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे ,तुम्ही कोणाबद्दल विचारताय? बारामतीकरांनी ज्याचं डिपॉझिट जप्त केलंय, त्याविषयी काय बोलणार? लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे”