बारामतीत दिव्यांगांसाठी ‘ऑन दि स्पॉट’ शिबिर; कृत्रिम हातपाय, कॅलिपर्सचे मोफत वितरण
आवाहन पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी किशोर माने यांनी केले आहे.

बारामतीत दिव्यांगांसाठी ‘ऑन दि स्पॉट’ शिबिर; कृत्रिम हातपाय, कॅलिपर्सचे मोफत वितरण
आवाहन पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी किशोर माने यांनी केले आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील पात्र अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम हातपाय, कॅलिपर्स व इतर सहाय्यभूत साधनांच्या वितरणासाठी ‘ऑन दि स्पॉट’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती, बारामती येथे होणार आहे.
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या वेळापत्रकानुसार हे शिबिर एस.आर. ट्रस्ट, मध्यप्रदेश व अॅलिम्को (ALIMCO), मध्यप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरात अधिकृत फॅब्रिकेटिंग एजन्सीचे तज्ज्ञ उपस्थित राहून पात्र लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष मोजमाप घेणार आहेत. त्यानुसार आवश्यकतेनुसार कृत्रिम हातपाय, कॅलिपर्स तसेच इतर सहाय्यभूत साधनांचे तात्काळ वितरण करण्यात येणार आहे.
या शिबिराचा लाभ केवळ पात्र अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना मोफत मिळणार आहे.
बारामती तालुक्यातील पात्र दिव्यांग व्यक्तींनी यूडीआयडी प्रमाणपत्रासह शिबिरस्थळी उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती व गटविकास अधिकारी किशोर माने यांनी केले आहे.






