शैक्षणिक

तुमचं हस्ताक्षर, तुमची ओळख – सर्जनशील कार्यशाळा आयोजन

इ. ५ वी ते ७ वी च्या विद‌यार्थ्यांसाठी आयोजित

तुमचं हस्ताक्षर, तुमची ओळख – सर्जनशील कार्यशाळा आयोजन

इ. ५ वी ते ७ वी च्या विद‌यार्थ्यांसाठी आयोजित

बारामती वार्तापत्र 

‘हस्ताक्षर हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो,’ म्हणून विद्यार्थ्यांना शालेय वयातच हस्ताक्षराला वळण देणे गरजेचे असते.

त्या अनुषंगाने सुंदर हस्ताक्षर कसे काढावे, याचे मार्गदर्शन करणारी कार्यशाळा नुकतीच वि‌द्या प्रतिष्ठान अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूल, चिंचोली येथे दि. १५/०१/२०२५, बुधवार रोजी आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र शासनाचा राज्यशिक्षक पुरस्कार प्राप्त प्राथमिक शिक्षक श्री. कृष्णा खंडू कुदळे, यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यशाळेचा उद्‌देश विदयार्थ्यांच्या हस्ताक्षरात सुधारणा करणे, स्वच्छ व सुंदर लेखन कौशल्य विकसित करणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे हा होता.

श्री. कुदळे सरांनी विदयार्थ्यांना सुंदर हस्ताक्षराचे महत्त्व सांगितले आणि विविध तांत्रिक बाबींचे प्रात्यक्षिक दाखवून हस्ताक्षर सुधारण्याच्या पद्‌धती शिकवल्या.

लेखन करताना कसे बसावे, पेन पकडण्याची योग्य पद्‌धत, अक्षरे व शब्द यांची मांडणी, अक्षरांमध्ये समान अंतर राखण्याचे महत्त्व, वळणदार स्वर व व्यंजने कशी लिहावीत इ.गोष्टींचे मार्गदर्शन केले. तसेच हस्ताक्षरावरून माणसाचा स्वभाव समजतो असेही ते यावेळी म्हणाले.

सोबतच विद्यार्थ्यांकडून देवनागरी भाषेतील लिपी चिन्ह, अक्षरांची वळणं, विविध आकार समूह यांचा सराव करून घेतला.

कार्यशाळेत विदयार्थ्यांनी अत्यंत उत्साहा‌ने सहभाग घेतला. सरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत सराव केला. या उपक्रमामुळे विदयाथ्यांच्या हस्ताक्षरात लक्षणीय सुधारणा होऊन त्याचा फायदा मुलांना मिळाला.

सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा हा उपक्रम शाळेच्या मराठी विभागातर्फे इ. ५ वी ते ७ वी च्या विद‌यार्थ्यांसाठी आयोजित केले गेला. कार्यशाळेच्या आयोजनासाठी सर्व मराठी विषय शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. विद‌यार्थ्यांनी या उपक्रमाबद्‌दल समाधान व्यक्त केले.

Related Articles

Back to top button