बारामतीत नविन आणखी ४ कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह.
बारामतीची रुग्ण संख्या 466 झालेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील काल एकूण 135 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी 93 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 38 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.आतापर्यंत बारामती शहरातील तीन आणि तालुक्यातील एक असे चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बारामती येथील खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 26 जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते, त्यापैकी 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून बारामती शहरातील फलटण रोड कसबा येथील एकाच कुटुंबातील तीन रुग्ण व सपनानगर बारामती येथील एक रुग्ण असे एकूण चार अॅंटीजेन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात बारामती शहरातील सात व ग्रामीण भागातील एक असे आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.